‘मेडिकल’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:08+5:30
कोरोना या महामारीच्या लढ्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व नर्सेस पुढे आहेत. या संकटात लढत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे धोरण अवलंबीने अपेक्षित आहे. मात्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायल उफराटा कारभार करत आहे. त्याचा निषेध म्हणून ३० जून ते २ जुलै या कालावधीत नर्सेस व चुतर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत नर्सेस, चुतर्थ व तृतीय श्रेणी कर्मचारी यांची सरळसेवेतून भरती केली जात नाही. सद्या परिचारिकांची भरती कंत्राटी आहे. परिचारिका व्यवसायासाठ ही बाब मारक आहे. तसेच अनुकंपाधरकांनाही संधी दिली जात नाही. शासनाच्या याच धोरणाचा निषेध म्हणून यवतमाळ मेडिकलमधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे.
कोरोना या महामारीच्या लढ्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व नर्सेस पुढे आहेत. या संकटात लढत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे धोरण अवलंबीने अपेक्षित आहे. मात्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायल उफराटा कारभार करत आहे. त्याचा निषेध म्हणून ३० जून ते २ जुलै या कालावधीत नर्सेस व चुतर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे.
कंत्राटी तत्वावर २९ दिवसांचा कार्यादेश घेऊन अनेक वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीत प्राधान्य द्यावे, हीच रास्त मागणी आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या यवतमाळ येथील अध्यक्ष मंगला ठाकरे, सुरेखा मदनकर, मध्यवर्ती संघटनेचे मंगेश वैद्य, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे.