शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

आई... तुझा अकाउंट नंबर सांग ना!

By admin | Published: December 30, 2016 12:11 AM

ग्रामीण भागातील गरोदर मातांना जननी सुरक्षा योजनेतून आर्थिक मदत दिली जाते.

आरोग्य विभागाची धावाधाव : जननी आरोग्य सुरक्षा योजनेच्या ‘टार्गेट’साठी हवे ‘आधार’ यवतमाळ : ग्रामीण भागातील गरोदर मातांना जननी सुरक्षा योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. ही मदत थेट मातेच्या बँक खात्यात द्यायची आहे. परंतु, ग्रामीण भागात प्रसूत झालेल्या हजारो महिलांच्या नावाने बँक खातेच नाही किंवा असलेले खाते आधार लिंक नाही. त्यामुळे सध्या अशा गरोदर किंवा प्रसूत झालेल्या मातांचे बँक खाते उघडण्यासाठी आरोग्य विभागाची मोठी धावाधाव सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूत झालेल्या मातेला केंद्र पुरस्कृत जननी सुरक्षा योजनेतून ७०० रुपयांची मदत दिली जाते. प्रसूती झाल्याबरोबर सात दिवसांच्या आत हे पैसे देणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित प्रसूत मातेच्या नावाने आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे. यवतमाळ जिल्ह्याला यंदा साधारण ११ हजार प्रसूत महिलांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट मिळाले होते. आतापर्यंत ८ हजार महिलांना लाभही देण्यात आला. मात्र, हा लाभ आरटीजीएस पद्धतीने बँक खात्यात टाकण्यात आला. या योजनेच्या नियमानुसार, प्रसूत महिलेच्याच आधार लिंक असलेल्या खात्यात डीबीटीएल पद्धतीने रक्कम जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता उर्वरित सुमारे ३ हजार महिलांना याच पद्धतीने लाभ देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. परंतु, बहुतांश महिलांकडे आधार लिंक असलेले खातेच नसल्याने अडचण झाली आहे. यावर मात करण्यासाठी आता तालुका पातळीवर विशेष शिबिर घेऊन नोंदणी झालेल्या गरोदर मातांचे बँक खाते उघडून दिले जात आहे. यवतमाळ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात २० डिसेंबरला तर वणी येथे २७ डिसेंबरला शिबिर घेऊन सुमारे ५०० महिलांचे खाते उघडण्यात आले आहे. परंतु, अद्यापही ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी अडीच हजार खाते उघडणे आवश्यक आहे. आॅक्टोबर ते डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात एकंदर १ हजार ३५८ महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला. ११ हजारांचे लक्ष्य गाठण्यासाठी येत्या काळात राळेगाव, पांढरकवडा अशा ठिकाणीही शिबिरे घेण्यात येणार आहेत. असे असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळमधील ‘डीबीटीएल’चे काम सरस ठरले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)