लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासोबतच मुबलक पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या ठिकाणाचा शोधही भूजल सर्वेक्षण विभाग घेत आहे.यावर्षी जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. त्यावर मात करण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. यामध्ये कळंब तालुक्यात ९३, दारव्हा ३५, यवतमाळ ६४, नेर १७, पांढरकवडा २३, बाभूळगाव ३३, दिग्रस ४३, वणी ६, उमरखेड ५४, आर्णी ८१, घाटंजी ३५, मारेगाव १४, पुसद ४४, राळेगाव ५, महागाव १०३, झरी १६ आणि वणी तालुक्यातील ८ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे.या विहिरींवरून पाणीटंचाईग्रस्त भागात पाणी पोहचविण्यासाठी ८९ टँकरची मदत घेतली जाणार आहे. त्यामध्ये कळंब ६, दारव्हा ५, यवतमाळ १२, बाभूळगाव ४, वणी २, नेर ५, उमरखेड २, महागाव २, आर्णी ११, पुसद १८, घाटंजी ४, मारेगाव १, पांढरकवडा २, दिग्रस ९, झरी ६ टँकरची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने टँकरचे नियोजनही जिल्हा परिषदेने केले आहे. गरज भासताच हे टँकर सुरू केले जाणार आहेत. यंदा पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने तगड्या उपाययोजना आखल्या आहे. मात्र खालची यंत्रणा गावपातळीवर अंमलबजावणी कशी करते यावरच सारे अवलंबून आहे.सहा गावात भीषण स्थितीजिल्ह्यात ८९ टँकर प्रस्तावित आहेत. असे असले तरी अत्यंत भीषण स्थिती असलेल्या सहा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील फत्तेपूर, नेरमधील खरडपूर, दारव्हा तालुक्यातील भांडेगाव, पुसद तालुक्यातील बाळवाडी, पाळोदी आणि मारवाडी अशा सहा ठिकाणी सध्या टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गतवर्षी १०८ टँकरने पाणीपुरवठापाणीटंचाई निवारण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यात १०८ टँकर सुरू करण्यात आले होते. यावर्षी पाणीटंचाई निवारण्यासाठी ८९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत १९ टँक र कमी लागणार आहे.
जिल्ह्यात ६६४ विहिरी अधिग्रहणाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 9:26 PM
जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे.
ठळक मुद्देप्रश्न पाणीटंचाईचा : भूजल सर्वेक्षणला मुबलक जलस्त्रोतांचा शोध