फाॅरेस्टचे फिरते पथक नावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 05:00 AM2021-12-10T05:00:00+5:302021-12-10T05:00:17+5:30

यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जंगल असुरक्षित झाले आहे. नागपूरच्या पथकाने यवतमाळात झालेली बिबट्याची शिकार, त्याचे अवयव व आरोपी यांना अटक करून ताब्यात घेतले.

Name the Forest Squad | फाॅरेस्टचे फिरते पथक नावाला

फाॅरेस्टचे फिरते पथक नावाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेली आहे. त्यातही सर्वांत मौल्यवान असं सागवान येथे आहे. आता येथील जंगलांमध्ये वाघ, बिबट यासह विविध प्राण्यांचाही अधिवास जंगलांमध्ये वाढला आहे. यामुळे वनविभागाच्या फिरत्या पथकाची जबाबदारी सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून या पथकाची कामगिरी शून्य आहे. ना लाकूड तस्करी उघड झाली, ना शिकारी हाती लागले.
यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जंगल असुरक्षित झाले आहे. नागपूरच्या पथकाने यवतमाळात झालेली बिबट्याची शिकार, त्याचे अवयव व आरोपी यांना अटक करून ताब्यात घेतले. दोन वर्षांपूर्वीची घटना नुकतीच उघडकीस आणली. मात्र, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या या पथकाला याची साधी कुणकुणही लागली नाही. 
फिरत्या पथकाला केवळ मालकी प्रकरणात इंटरेस्ट आहे. त्यासाठी प्रति मीटर ४०० रुपये वसूल केले जातात. तर, टाल तपासणीच्या नावाखाली २५०० रुपये आकारले जाते. यातील बहुतांश ठिकाणी विनापासिंगचा हॅमरिंग नसलेला आडजात लाकडाचा माल कटाईला आणला जात आहे. मात्र, याकडे पूर्णत: डोळेझाक केली जात आहे. विशेषत: अकोला बाजार परिसरात हा आडजातचा माल ठराविक आरागिरण्यांवर पोहोचत आहे. 

गोदाम फैलातील टालांवर विशेष मर्जी
गोदाम फैल परिसरातील दोन टालांवर वनविभागाच्या स्थानिक पथकाची विशेष मर्जी दिसत आहे. त्यामुळेच अवैधरीत्या कटाई केलेले आडजात लाकूड बिनधास्तपणे या टालांवर आणले जात आहे. याचे ट्रक दररोज शहरात भरून येत आहेत. त्यावर आजतागायत कारवाई करण्यात आली नाही. याचे पर्यावरणप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Web Title: Name the Forest Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.