शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

नेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

By admin | Published: December 30, 2016 12:15 AM

तालुक्यात सक्षम नेतृत्त्वाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे.

अनेकजण सोडचिठ्ठीच्या तयारीत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर परिणाम किशोर वंजारी   नेर तालुक्यात सक्षम नेतृत्त्वाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. अनेक महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने एकेकाळी काँग्रेसवर वरचढ ठरणारी राष्ट्रवादी सध्याच्या परिस्थितीत कमकुवत झाली आहे. अनेक पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारीसुद्धा पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षातून जाणाऱ्यांचा वेग अशाच प्रकारे कायम राहिल्यास याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर निश्चित होणार आहे. याचा फायदा विरोधी पक्षांना मिळणार आहे. एकेकाळी काँग्रेसवर वरचढ ठरणारी राष्ट्रवादी सध्या या परिस्थितीत का पोहोचली आहे, याबाबत आत्मपरिक्षण करण्याची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीची स्थापना केली. धुरंदर वलय असलेल्या पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची स्थिती भक्कम केली. याचवेळी शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राजकारण करणारे बाबू पाटील जैत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन नेर तालुक्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवली. सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करून राष्ट्रवादीचे वलय निर्माण केले. गावागावात सक्रिय कार्यकर्ते निर्माण केले. तालुक्यात राष्ट्रवादीचा पहिला नेता म्हणून बाबू पाटील यांचेच नाव आजही घेण्यात येते. दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून उत्तमदादा पाटील गटाचे वसंतराव घुईखेडकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नेतृत्त्व कुणाचे यावर खल सुरू झाला. बाबू पाटील जैत यांना न सांगताच अनेक निर्णय होवू लागले. जैत यांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ज्यांनी राष्ट्रवादीला तालुक्यात भक्कम स्थिती निर्माण करून दिली, त्यांनाच डावलण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू राहिली. ा्रचंड गट-तट, हेवे-दावे तालुक्यात सुरू झाले. मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची अजूनही जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये हवी तशी पकड नाही. बाबू पाटलांचा मोठा गट शिवसेनेच्या वाटेवर गेल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली व दर्जेदार अशा कार्यकर्त्यांची फौजही कमी झाली. उलट विधानसभा निवडणुकीत ही पोकळी लक्षात आली. मूठभर कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंहगर्जना करणारे राष्ट्रवादीचे नेते भुईसपाट झाले. नेर तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गट-तट आहेत. एकोपा संपला आहे. सहकार क्षेत्रातील पकडही आता ढीली झाली आहे. एकेकाळी काँग्रेससोबत सहकार गाजविणारे राष्ट्रवादी आता कुण्या दालनात बसेल हे सांगता येत नाही. पक्षश्रेष्ठींनी राकाँची ही अवस्था लवकरच दूर न केल्यास राष्ट्रवादीची स्थिती अतिशय दयनीय होणार आहे. शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. उल्लेखनीय म्हणजे एकही बॅनर शहरात कुठेही लागले नव्हते. त्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीविषयी किती प्रेम आहे, याबाबतची चर्चा जिल्हाभर रंगत आहे.