जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:45 AM2017-07-20T00:45:26+5:302017-07-20T00:45:26+5:30

जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Only 32 percent of the rain in the district | जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पाऊस

जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पाऊस

Next

गतवर्षी होता ६० टक्के : १५ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी, धरणे तहानलेलीच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी यावेळीपर्यंत ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत २८ टक्के पाऊस कमी झाला आहे. दरम्यान पावसाच्या प्रतीक्षेत १५ हजार हेक्टरमधील पेरण्या उलटल्या असून सर्वच प्रकारची धरणेही कोरडी आहेत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असला, तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी झाली. दमदार पाऊस नसल्याने १२ लघुु प्रकल्प आणि २५० सिंचन तलावही कोरडे असून इतर जलाशयात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
मान्सूनचे पुनरागमन झाल्याने हवामान खात्याने १८, १९ आणि २० जुलैला जोरदार पावसाचा इशारा दिला होता. हा इशारा यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: खोटा ठरला. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुुलैच्या मध्यापर्यंत तब्बल ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी हा पाऊस केवळ ३२ टक्केच्या घरात आहे. गतवर्षीच्या तुुलनेत निम्माच पाऊस झाला. मागील वर्षी १९ जुलैपर्यंत ४७९ मिमी पावसाची नोंद होती. यावर्षी केवळ २५३ मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी तब्बल २२६ मिमी पाऊस कमी झाला आहे.
जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड आहे. त्याचा परिणाम पिकांवर झाला. अपुऱ्या पावसाने मूग, उडीद, ज्वारी आणि तुरीचे क्षेत्र घटले, तर कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. आजपर्यंत चार लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र अपुऱ्या पावसाने तब्बल १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. यात त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. यवतमाळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. येथे वार्षिक सरासरीच्या केवळ १३ टक्के पाऊस बरसला. सर्वाधिक ६९ टक्के पावसाची नोंद पुसद तालुक्यात करण्यात आली आहे.

जलाशयात १६ टक्केच पाणी जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प अद्याप कोरडे आहे. यात उमर्डा, सिंगणडोह, लोहतवाडी, नेर, रूई, खरद, घाटाना, दुधाना, पहूर (ई.) बोर्डा, मुडाणा आणि पोफाळी प्रकल्पांचा समावेश आहे. इतर ६२ लघु प्रकल्पात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या पूस प्रकल्पात १६, तर गोकीत १०.१८, वाघाडी १६.९१, सायखेडा ३५.३६, लोअरपूस ४६.०७ आणि बोरगाव प्रकल्पात १.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

 

Web Title: Only 32 percent of the rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.