‘जेडीआयईटी’मध्ये ‘पेस क्लब’तर्फे पालक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:42 AM2017-11-06T00:42:02+5:302017-11-06T00:42:14+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या पेस क्लबतर्फे पालक सभा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या पेस क्लबतर्फे पालक सभा घेण्यात आली. प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर अध्यक्षस्थानी होते. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख प्रा.जे.एच. सातूरवार, प्रथम वर्ष प्रभारी प्रा.व्ही.आर. गंधेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर यांनी मार्गदर्शन करून पालकांच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले.
प्रा.जे.एच. सातूरवार यांनी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेचे महत्त्व सांगून विविध सुविधा व नियमावलीची माहिती दिली. विद्यार्थ्यांची प्रतिभा उंचावण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सीएसआय क्लब आणि पेस क्लब कार्यरत असल्याचे ते म्हणाले. प्रा.व्ही.आर. गंधेवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि पुरस्काराबद्दल पालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये कैलेश गव्हाणकर, सुनील समदूरकर, मृणाल बिहाडे, राजेश अंगाईतकर, अनिता कोरचे यांचा समावेश आहे. शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती व प्रगती अहवाल पालकांपुढे सादर करण्यात आला. संचालन प्रा.एम.के. पोपट यांनी केले. यशस्वीतेसाठी पेस क्लबचे प्रभारी प्रा.पी.पी. लोकुलवार, उपप्रभारी प्रा.ए.ए. वंजारी आदींनी पुढाकार घेतला. सभा आणि उपक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा व सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.