अमरावती जिल्ह्यातील पारवा, पांढरकवडाची माती सिनेमाच्या पडद्यावर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:11 PM2020-01-15T12:11:14+5:302020-01-15T12:11:35+5:30

ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे.

Parva in Amravati district, white clay on the screen of cinema ..! | अमरावती जिल्ह्यातील पारवा, पांढरकवडाची माती सिनेमाच्या पडद्यावर..!

अमरावती जिल्ह्यातील पारवा, पांढरकवडाची माती सिनेमाच्या पडद्यावर..!

Next
ठळक मुद्देयवतमाळच्या ग्रामीण संस्कृतीचे रूपेरी दर्शन घडणार

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळचे शेतकरी वेगळी वाट चोखळत नाही, म्हणून ते मागे पडले... ही आवई वारंवार उठविली जाते. मात्र आता याच मातीतल्या कृषीपुत्रांनी येथल्या ग्रामीण संस्कृतीचा बहारदार चेहरा थेट सिनेमाच्या पडद्यावर चितारला आहे. ग्रामीण माणसाच्या जगण्याची वहिवाट दर्शविणाऱ्या सिनेमाचे नावही आहे ‘वेगळी वाट’!
घाटंजी तालुक्यातील देवधरी येथील अच्युत नारायण चोपडे या युवकाने चित्रपटनिर्मितीचे हे धाडस केले आहे. तर घाटंजी आणि पांढरकवडा परिसरातीलच कलावंतांनी भूमिका करून जणू स्वत:चेच जगणे स्वत:च चित्रित केले आहे. पूर्वी चारशे गावांच्या वतनदारीचे गाव असलेल्या पारवा परिसरातील शेतशिवारांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. तर ‘इन डोअर शूट’ आबासाहेब पारवेकर विद्यालयात पार पडले. शिवाय पांढरकवडा तालुक्यातील शेतशिवार आणि पांढरकवडा येथील बसस्थानकात चित्रीकरण करण्यात आले.
ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे.

मामाच्या गावात घडला दिग्दर्शक
अच्युत नारायण चोपडे हे या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. त्यांचे जन्मगाव आदिलाबादजवळचे बेला. पण गरिबीमुळे त्यांना मामाच्या गावी देवधरी (ता.घाटंजी) येथेच ठेवण्यात आले. या खेड्यातील यात्रेत येणाºया टुरिंग टॉकिजमुळे अच्युत सिनेमाचे चाहते बनले. कथा ऐकणे आणि सांगणे हा त्यांचा बालवयातला छंद होता. तोच छंद जोपासत आता त्यांनी चक्क सिनेमा साकारला आहे.

बालवयात गरिबी अनुभवली. आपल्या जिल्ह्याची बोलीभाषा, कृषी संस्कृती, माणसे ही जगाला दाखवावी म्हणून सिनेमा निर्मिती केली.
- अच्युत चोपडे, दिग्दर्शक

Web Title: Parva in Amravati district, white clay on the screen of cinema ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा