पुसदमध्ये पथदिव्यांच्या दुरुस्ती कामाला गती

By Admin | Published: March 12, 2017 12:56 AM2017-03-12T00:56:58+5:302017-03-12T00:56:58+5:30

शहरातील बंद असलेल्या पथदिवे दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला असून शहरातील बहुतांश भागातील खांबांवरील पथदिवे प्रकाशमान झाले आहे.

Patience repair works in speed | पुसदमध्ये पथदिव्यांच्या दुरुस्ती कामाला गती

पुसदमध्ये पथदिव्यांच्या दुरुस्ती कामाला गती

googlenewsNext

न. प. सभापतींचा पुढाकार : महापुरुषांचे पुतळे प्रकाशमान
पुसद : शहरातील बंद असलेल्या पथदिवे दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला असून शहरातील बहुतांश भागातील खांबांवरील पथदिवे प्रकाशमान झाले आहे. विद्युत सभापतींनी यासाठी पुढाकार घेतला असून धार्मिकस्थळे आणि महापुरुषांच्या पुतळ्याजवळील पथदिवे प्राधान्यक्रमाने लावण्यात आले आहे.
पुसद शहरात गत काही वर्षांपासून पथदिव्यांची समस्या निर्माण झाला होती. शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक पथदिवे बंद होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने गत आठवड्यात वृत्त प्रकाशित केले होते. यात शहरातील पथदिव्यांची समस्या मांडण्यात आली होती. त्यानंतर नगरपरिषदेच्या विद्युत सभापतिपदी पंचशीला राहुल कांबळे यांची निवड करण्यात आली. त्यांनी सभापतिपदाचा प्रभार घेताच कामाला सुरुवात केली. आता शहरातील बहुतांश खांबांवरील पथदिवे सुरू झाले आहे. सर्वप्रथम गावातील महापुरुषांच्या पुतळा परिसरात असलेले हायमास्क सुरू करण्यात आले. तसेच शहरातील धार्मिकस्थळ परिसरातील पथदिवे लावल्याचे सभापती पंचशीला कांबळे यांनी सांगितले. नगरपरिषदेचे चार आणि कंत्राटदाराचे चार कर्मचारी शहरात पथदिव्याचे काम करीत असून अग्निशमन दलाचे कर्मचारीही मदतीला घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. साधन सामुग्रीचा अभाव असला तरी शहरातील पथदिवे पूर्णपणे लावण्यात येतील. नागरिकांच्या आलेल्या तक्रारी तत्काळ सोडविल्या जात असून नागरिकही समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष अनिताताई नाईक, आमदार मनोहरराव नाईकांच्या पत्नी असल्याने शहरातील पथदिव्यांची समस्या तत्काळ मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वत: कर्मचाऱ्यांना घेवून प्रत्येक वॉर्डात फिरत असून वीज अभियंताही सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शहरातील पथदिव्यांचा अभ्यास असलेले वीज विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी बलदेव चव्हाण यांचीही मदत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. थेट जनतेशी संवाद साधून पथदिव्यांची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (कार्यालय चमू)

Web Title: Patience repair works in speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.