धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायलं, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:21 PM2021-04-24T20:21:17+5:302021-04-24T20:23:42+5:30

डीएसपी संजय पूजलवार यांनी सांगितल्यानुसार, 7  जणांनी सॅनिटायझर पिल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

People drunked sanitizer if alcohol is not found 7 dead in yavatmal says police | धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायलं, 7 जणांचा मृत्यू

धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायलं, 7 जणांचा मृत्यू

Next

यवतमाळ- जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वंनी दारू न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यानंतर त्यांचा मृत्यू झाला. (People drunked sanitizer if alcohol is not found 7 dead in yavatmal says police)

लॉकडाउन असल्याने सध्या दारूची दुकानं बंद आहेत. त्यामुळे दारू पिणाऱ्या लोकांना भटकावे लागत आहे. दारूची तलफ त्यांच्यासाठी मृत्यूचे कारण बनत आहे. पहिली घटना वनी शहरातील आहे. येथे दत्तू कवडूजी लांजेवार आणि भारत प्रकाश रूईकर या दोघांनी दारू न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायले होते.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

यानंतर दत्तू कवडूजी लांजेवार आणि भारत प्रकाश रूईकर हे दोघे सॅनिटायझर पिऊन आपापल्या घरी गेले. यानंतर दोघांच्याही छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ते काही वेळानंतर पुन्हा घरी परतले. मध्यरात्री पुन्हा त्यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. तर, दुसरी घटना आयता नगर येथील आहे. येथे संतोष मेहर, गणेश नांदेकर, गणेश शेलार आणि सुनील ढेंगले यांचा मृत्यू झाला आहे. सॅनीटायझर पिल्यानेच यांचाही मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

डीएसपी संजय पूजलवार यांनी सांगितल्यानुसार, 7  जणांनी सॅनिटायझर पिल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांतील चौघांचा मृत्यू शुक्रवारी झाला. त्यांच्या नातलगांनी पोलिसांना न सूचना देताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या लोकांनी दारू न मिळाल्याने सॅनिटायझर पिल्याचे चौकशीतून समोर आले आहे. 

CoronaVirus : IPS अधिकारी बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले 78 रुग्ण

Web Title: People drunked sanitizer if alcohol is not found 7 dead in yavatmal says police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.