पोलीस गस्त टपरी चालकांच्या मुळावर

By admin | Published: July 16, 2014 12:28 AM2014-07-16T00:28:41+5:302014-07-16T00:28:41+5:30

स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे.

Police patrol toppled drivers | पोलीस गस्त टपरी चालकांच्या मुळावर

पोलीस गस्त टपरी चालकांच्या मुळावर

Next

बंद करण्यावर चार्लीचा भर : स्थानिक पोलिसांचा जोर मात्र दुकाने उघडण्यावर
यवतमाळ : स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी त्यांची व्यावसायिक आणि ग्राहकांशी वागण्याची पध्दत चूकीची आहे. तर स्थानिक पोलीस स्वत:च्या जिभेचे चोचले त्यातही विनामूल्य भागविण्यासाठी चार्ली पथकाने बंद केलेली दुकाने उघडायला लावतात, हे विशेष!
वर्षभरापासून यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हद्दीत सुरू असलेले जबरी चोरी व घरफोडीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. चोरट्यांना हुडकून काढा, त्यांना चोरीतील मुद्देमालासह अटक करा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून यवतमाळ शहर, वडगाव रोड, स्थानिक गुन्हे शाखा, चार्ली पोलीस पथक यांची दररोजच कानउघाडणी केजी जाते. मात्र एकाही घटनेचा छडा लावण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. त्यामध्ये यश येत नसले तरी या घटनांना आळा बसावा, म्हणून आता रात्रगस्त नित्यनेमाने केली जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे आणि चार्ली पोलीस पथक रात्रीदरम्यान शहरात गस्त घालतात. चार्ली पोलीस पथकाकडून व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याबरोबरच संशयित आणि मद्यपींची चौकशी केली जाते. विशेष करून टपऱ्या बंद करून नागरीकांना घराकडे परतवून लावण्याकडे त्यांचा भर असतो. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. मात्र हे करीत असतानाच अनेक प्रतिष्ठीत नागरिकांशी पथकातील कर्मचारी असभ्य वर्तन करतात. त्यांना शिविगाळ केली जाते. टपरी चालकांना मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे चार्ली पोलीस पथकाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन आता बदलत चालला आहे. उगाच वैर कशाला म्हणून टपरी चालक आपले दुकान गुंडाळतात. घराकडे निघण्याच्या बेतात असतानाच स्थानिक पोलिसांची गस्ती पथक तेथे पोहोचते. तसेच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी बंद केलेले दुकान उघडायला लावतात. विशेष असे की, बहुतांश पोलीस कर्मचारी या टपरीचालकांना पैसे न देताच निघून जातात. पुन्हा दुकान बंद करताना चार्ली पोलिसांच्या हाती लागले की, शिवीगाळ, वाहनातील चाकांची हवा सोडणे, चालान अशा प्रकारांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे टपरी चालकांची स्थिती अडकीत्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Police patrol toppled drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.