ऑनलाईन लोकमतयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमाचा विसर पडला. शासन निर्णयानुसार हा कार्यक्रम घेणे अनिवार्य आहे. प्रकरणी अधिष्ठात्यांचा निषेध नोंदवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बंजारा समाजबांधवांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन केली आहे.सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमाविषयी महाविद्यालयाने कुठलेही सूचनापत्र काढले नाही. दुसरीकडे मात्र अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा व्हावा यासाठी परिपत्रक काढले. मोठमोठे शुभेच्छा फलक महाविद्यालयाच्या आवारात लावले. न्याय वैद्यक शास्त्र विभागातून अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे या पत्रकात म्हटले आहे. मात्र संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्याविषयी कुठलीही सूचना देण्यात आली नाही. हा प्रकार गंभीर आहे. अधिष्ठात्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना कारभारी ज्ञानेश्वर चव्हाण, एन.टी. जाधव, राजुदास जाधव, अनिल आडे, अशोक जाधव, देवीदास राठोड, डॉ. निशांत चव्हाण, प्रा. योगेश राठोड, प्रा. महेश राठोड, नाना राठोड, अॅड. जगदीश पवार आदी उपस्थित होते.
‘मेडिकल’च्या अधिष्ठात्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:49 PM
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमाचा विसर पडला. शासन निर्णयानुसार हा कार्यक्रम घेणे अनिवार्य आहे.
ठळक मुद्देसेवालाल महाराज जयंतीचा विसर : बंजारा समाजाचे निवेदन