२६३ इमारतींतच रेन वॉटर हार्वेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:32 PM2019-08-07T23:32:05+5:302019-08-07T23:32:41+5:30

वाढत्या शहरीकरणाने सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तर पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे. शहरांमध्ये सर्वत्र काँक्रीटीकरणाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे हा आहे.

Rainwater harvesting within two buildings | २६३ इमारतींतच रेन वॉटर हार्वेस्टिंग

२६३ इमारतींतच रेन वॉटर हार्वेस्टिंग

Next
ठळक मुद्देयवतमाळ शहर : ७५ हजार इमारतींवर प्रश्नचिन्ह, केवळ कागदावरच उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाढत्या शहरीकरणाने सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तर पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे. शहरांमध्ये सर्वत्र काँक्रीटीकरणाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे हा आहे. मात्र कठोर कायदेशीर तरतूद असूनही यवतमाळात रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेच जात नाही. याचे नगरपरिषद व नगररचना विभागालाही कोणतेच सोयरसूतक नाही. चिरीमिरी दिली की सोईच्या पद्धतीने बांधकाम परवानगी मंजूर केली जाते. यामुळेच शहराचे वाळवंट होण्याची स्थिती आहे.
नगरपरिषदेच्या सर्व्हेक्षणातूनच हा गंभीर प्रकार पुढे आला आहे. शहरातील २६३ इमारतीतच रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. उर्वरित ७५ हजार इमारतींमध्ये कुठेही पावसाच्या पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. नगरपरिषदेने नव्याने बांधकाम परवानगी दिलेल्या २ हजार ३७० इमारतीचे सर्व्हेक्षण केले. त्यातील केवळ २६३ इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग झाल्याचे निदर्शनास आले आहे. याला पालिकेचा नगररचना व बांधकाम विभागाच पूर्णत: जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. काही संघटना याबाबत जनजागृती करीत आहे. त्यानंतरही अनेक व्यावसायिक व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेले नाही.

नगरपरिषद यंत्रणेचे दुर्लक्ष
पाणीटंचाईपासून यवतमाळकर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी जागरुक आहे. यापूर्वी ज्यांनी घर बांधले. त्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक होते. हे काम पार पडले अथवा नाही याची पाहण्याची संपूर्ण जबाबदारी नगर रचना विभाग आणि नगरपरिषदेच्या अभियंत्यांची आहे. असे असले तरी याकडे नगर परिषद यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. - कांचन चौधरी, नगराध्यक्ष

नागरिक स्वत:च पुढाकार घेतात
इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. अलिकडच्या काळात नागरिकांमध्ये जागरुकता वाढत आहे. इमारत बांधताना घर मालक स्वत: रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आग्रह करतात. यामुळे नवीन इमारतींमध्ये अलिकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे स्ट्रक्चर तयार केले जात आहे. बोअरवेल आणि विहिरींच्या बाजूला असा प्रयोग केला जातो. यामुळे पुढील काळात जलपुनर्रभरण वाढेल. - छडानंद राजूरकर, माजी नगररचनाकार

असे केले जाते जल पुनर्भरण
पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी

Web Title: Rainwater harvesting within two buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस