आगीत घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:15 PM2019-03-29T22:15:04+5:302019-03-29T22:15:24+5:30

येथील वामनघाट मार्गावर असलेल्या पहाडी मोहल्ल्यात शुक्रवारी सकाळी एका घराला भीषण आग लागून या आगीत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. या दुर्घटनेत अंदाजे ॅ१५ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहाणी टळली. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते.

Rakharangoli of the house | आगीत घराची राखरांगोळी

आगीत घराची राखरांगोळी

Next
ठळक मुद्देवणीतील घटना : १५ लाखांचे नुकसान, रोख रक्कमही जळाली

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील वामनघाट मार्गावर असलेल्या पहाडी मोहल्ल्यात शुक्रवारी सकाळी एका घराला भीषण आग लागून या आगीत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. या दुर्घटनेत अंदाजे ॅ१५ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहाणी टळली. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते.
पहाडी मोहल्ला परिसरात अण्णा सहारे यांचे घर आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरातील सदस्य दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक स्वयंपाक घरात आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता-पाहता संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. आगीची घटना लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत घरातील टिव्ही, कपडे, धान्य, अन्य वस्तूंसह आलमारीत ठेवून असलेली रोख ७५ हजारांची रक्कम आगीत जळाली. या दुर्घटनेत १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग ईतकी भीषण होती की, आगीचे लोळ शेजारीच राहणाऱ्या ज्योती सहारे यांच्या घरापर्यंत पोहचले. त्यामुळे त्यांचेदेखील २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
मोठी दुर्घटना टळली
विशेष म्हणजे स्वयंपाक घरातून आग लागली. त्या ठिकाणी सिलिंडर होते. मात्र सुदैवाने आगीचे लोळ सिलिंडरपर्यंत पोहचले नाही. काहींनी धाडसाने आत घुसून सिलिंडर उचलून बाहेर आणले. आगीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.

Web Title: Rakharangoli of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग