मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना
By admin | Published: March 12, 2017 12:57 AM2017-03-12T00:57:40+5:302017-03-12T00:57:40+5:30
सर्व जाती, धर्मातील विचारवंतांनी एका छताखाली येऊन समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे,
सलाउद्दीन शेख : फुलसावंगीत ‘जातीय सलोखा’
फुलसावंगी : सर्व जाती, धर्मातील विचारवंतांनी एका छताखाली येऊन समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भिवंडी येथील व्याख्याते सलाउद्दीन शेख यांनी केले. ‘मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा’ अशा ओळींतून सर्वधर्म समभावाचे महत्त्व त्यांनी सांगितले.
येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांच्या मार्गदर्शनात जातीय सलोखा कार्यक्रम झाला. यावेळी सलाउद्दीन शेख यांनी मार्गदर्शन केले. सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, पोलीस निरीक्षक वाघू खिल्लारे, ठाणेदार करीम बेग मिर्झा, तंटामुक्ती अध्यक्ष याकूब खान उपस्थित होते. अजयकुमार बन्सल यांनी फुलसावंगी येथे घडलेल्या घटनेची माहिती सांगून गुन्हेगार कोणत्याही धर्माचा नसून तो केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो. गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे पडसाद उमटून जातीय सलोखा नष्ट होते, असे ते म्हणाले.
पोलीस पाटील राजेश नाईक, उपसरपंच अमरदीप दळवे, जयप्रकाश जयस्वाल, नवाब जानी कमर बेग, इकबाल खान, शरद प्रतापवार, हारुणभाई, अरुण धकाते, शमीउल्ला खान, योगेश वाजपेई, डॉ.इरफान कुंदन, बळवंत दळवे, शम्मी खान पठाण, आरिफ खान, भगिरथ नाईक, संदेश मुतेपवार, गुजाबराव उबाळे, सुरेश जयस्वाल, युनूस टेलर, गणेश भगत, बापुराव व्हडगिरे, नीलेश जयस्वाल, दत्ता खडतकर, मुख्याध्यापक संतोष रामधनी, सचिन गोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, सुरेश पवार, प्रशांत स्थूल, युवराज जाधव, मिलिंद दरेकर, सुनील पंडागळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)