लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा व्हावा तसेच शैक्षणिक संस्था, कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती या ठिकाणी संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात यावा या मागणीचे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संविधानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी संबंधिताना कार्यक्रम घेण्याबाबत सूचना देण्यात याव्या. संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम सर्व कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात यावी, असे यानिवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, नामदेवराव थूल, किरण मानकर, सुनील वनकर, तुषार आत्राम, राजू सूर्यवंशी, हरिश रामटेके, राजकुमार उमरे, कृष्णा ढोले, संजय डांगे, रितेश भगत, श्रीकांत मडावी, शीतल वानखडे, नीलेश सोनटक्के, अनिल डोंगरे, ज्योती वासेकर, डॉ. सदांशिव, प्रवीण देवतळे, प्रवीण गोबरे, गिरीधर ढोक, नंदराज गुजर, महेंद्र कावळे, राजेंद्र वाघमारे, महेंद्र भरणे, सुहास परिकर, अरुणा बन्सोड, किरण गाडगे, लिना गजभिये, प्रमोद बनसोड आदी उपस्थित होते.
संविधान सप्ताहासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:10 PM