लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई) अशा १४७ पदांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार असलेले कोणतेही आरक्षण या नोकरभरतीला लागू राहणार नसल्याचे बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.लिपिकाच्या १३३ व सहायक कर्मचाऱ्याच्या १४ जागांसाठी ही आॅनलाईन परीक्षा घेतली जात आहे. कोणतीही नोकरभरती म्हटली की तेथे आरक्षणाचा मुद्दा येतो. परंतु यवतमाळ जिल्हा बँकेची नोकरभरती या आरक्षणाला जणू अपवाद ठरली आहे. तेथे कोणतेही आरक्षण लागू राहणार नसल्याचे सांगण्यात आले. त्या मागे शासनाचे बँकेत भागभांडवल नसणे हे प्रमुख कारण सांगण्यात आले. राज्यातील १२ ते १४ बँकांमध्येच शासनाचे भागभांडवल असून त्यात विदर्भातील वर्धा व नागपूर या बँकांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्हा बँकेकडेही आठ-दहा वर्षांपूर्वी शासनाचे भागभांडवल होते. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी घेतल्या गेलेल्या नोकरभरतीला आरक्षण लागू होते. परंतु आता बँकेने शासनाच्या भागभांडवलाची रक्कम सात वर्षांपूर्वी परत केल्याने बँकेच्या नोकरभरतीत कोणतेही आरक्षण लागू नाही.पहिल्या वर्षी नऊ हजार देणारनोकरभरतीत पात्र ठरलेल्या लिपिकाला पहिल्या वर्षी नऊ हजार तर सहायकाला पाच हजार रुपये ठराविक रक्कम दरमाह दिली जाणार आहे. या काळात हा उमेदवार परिविक्षाधीन म्हणून ओळखला जाईल. यानंतर त्याला बँकेने जाहिरातीत नमूद केल्यानुसार वेतन सुरू होणार आहे.बँक म्हणते, शुल्क कमीचशेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्तीमध्ये नोकरभरतीचा अर्ज करताना उमेदवाराला एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. या शुल्काबाबत शेतकरी पुत्र व सुशिक्षित बेरोजगारांमध्ये ओरड होत आहे. हे शुल्क खूप जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बँकेने हे शुल्क अन्य बँकांच्या तुलनेत कमीच असल्याचे म्हटले आहे. आयबीपीएस, सांगली बँक दोन हजार रुपये आकारत असल्याचेही सांगण्यात आले.जिल्हा बाहेरील उमेदवारांना ब्रेकजिल्हा बँकेच्या या नोकरभरतीत बाहेर जिल्ह्यातून आॅनलाईन फार्म भरणाºया उमेदवारांना अप्रत्यक्ष ब्रेक लावण्यात आला आहे. कारण आॅनलाईन अर्जासोबत एक हजार रुपये शुल्क भरताना ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही ९४ शाखांपैकीच भरले जावे व त्याची पावती जोडली असेल तरच अर्ज स्वीकारला जाईल, अशी अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे बाहेरील उमेदवारांना बºयापैकी ब्रेक लागून स्थानिकांना संधी मिळू शकते.एजन्सीला प्रति उमेदवार २२९ रुपये दरअमरावतीच्या एजंसीमार्फत ही नोकरभरती घेतली जात आहे. त्यापोटी प्रति उमेदवार २२९ रुपये दिले जाणार आहे. १४७ जागांसाठी आतापर्यंत एक हजारांवर अर्ज आले आहे. प्राप्त व पात्र अर्जांची संख्या पाहून आॅनलाईन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये ही भरती घेतली जाणार आहे. ९० गुणांची ही परीक्षा आहे. पाच गुण मुलाखतीला तर पाच शैक्षणिक प्रमाणपत्रांना दिले जाणार आहे. या परीक्षेत बँकेचा कोणताही हस्तक्षेप राहणार नसल्याचेही बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा बँक नोकरभरतीत आरक्षण लागू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:11 PM
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई) अशा १४७ पदांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार असलेले कोणतेही आरक्षण या नोकरभरतीला लागू राहणार नसल्याचे बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठळक मुद्देशासनाचे भागभांडवल नसल्याचा परिणाम : १४७ पद, एक हजार अर्ज