रोहितच्या न्यायासाठी तरुणाई रस्त्यावर

By admin | Published: January 25, 2016 03:34 AM2016-01-25T03:34:27+5:302016-01-25T03:34:27+5:30

हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नाही, तर अभविपच्या माध्यमातून हत्याच

Rohit's juvenility on the road to justice | रोहितच्या न्यायासाठी तरुणाई रस्त्यावर

रोहितच्या न्यायासाठी तरुणाई रस्त्यावर

Next

यवतमाळ : हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आत्महत्या केली नाही, तर अभविपच्या माध्यमातून हत्याच झाल्याचा आरोप करीत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात तरूणांनी या घटनेचा निषेध नोंदविला. या हत्येला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात संपूर्ण देशभरात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ३१ राज्य, ५५० जिल्हे, ४००० तालुक्यात रविवारी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा सहभागी झाला होता. स्थानिक आझाद मैदानातून निघालेला हा मोर्चा बसस्थानक चौक मार्गे जिल्हा कचेरीवर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व सचिन खनतळे, दीपक ब्राह्मणे, विक्रम भलावी, प्रशांत मुनेश्वर यांनी केले. अ‍ॅड. अनिल किनाके, अ‍ॅड. खुशाल शेंडे, कृष्णा किनाके, विजयराज शेगोकार सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Rohit's juvenility on the road to justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.