सखी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:46 AM2017-11-17T00:46:48+5:302017-11-17T00:46:59+5:30

आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणाºया, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाºया जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रीयांचा ‘सखी सन्मान’ पुरस्कार देऊन....

Sakhi Samman Award distribution ceremony on Sunday | सखी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

सखी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

Next
ठळक मुद्देसेवाव्रतींचा गौरव : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी पाटील यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणाºया, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाºया जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रीयांचा ‘सखी सन्मान’ पुरस्कार देऊन एका शानदार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता येथील दर्डा उद्यान स्थित ‘शक्तीस्थळ’ येथे आयोजित आहे.
या सेवाव्रतींचा सत्कार नागपूर येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरीताई आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्या सुविद्य पत्नी मीनल येरावार उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सामाजिक, शौर्य, क्रीडा, औद्योगिक व व्यावसायिक, आरोग्य, शैक्षणिक, साहित्यीक आणि सांस्कृतिक या विभागात पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील स्त्री-पुरुष सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Sakhi Samman Award distribution ceremony on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.