संघटन खिळखिळे, नवसंजीवनीची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:48 AM2017-11-17T00:48:38+5:302017-11-17T00:48:53+5:30
सुमारे तीन वर्षांपासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात संघटन अक्षरश: खिळखिळे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुमारे तीन वर्षांपासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात संघटन अक्षरश: खिळखिळे झाले आहे. त्यामुळे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या यवतमाळातील मुक्कामी दौºयातून पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
एकेकाळी जिल्ह्यात राष्टÑवादी काँग्रेसचा प्रचंड बोलबाला होता. सर्वच समाज, विभाग व गटांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने यवतमाळात राष्टÑवादीची ताकद वेगाने वाढली होती. याच ताकदीच्या बळावर काही विधानसभा मतदारसंघ काबीज करू, अशी नेतृत्वाची अपेक्षा होती. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नेतृत्वच दहा-बारा हजारात गुंडाळले गेल्याने राष्टÑवादीतील गर्दीचा फुगा फुटला आणि राष्टÑवादी वेगाने कमीही झाली. आजच्या स्थितीत अनेक तालुक्यात तर राष्टÑवादी नामफलकापुरतीच उरली आहे. पुसदमध्ये पक्षाचे तेवढे आमदार व नगराध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेमध्ये राष्टÑवादीच्या ११ जागा आहेत. त्यांच्यातही पदावरून धुसफूस ऐकायला मिळते. वणीमध्ये राष्टÑवादीवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. पांढरकवड्यात राष्टÑवादी अगदीच सर्कलपुरती मर्यादित आहे. यवतमाळात कधीकाळी कामे मिळविण्याच्या लालसेने का होईना दिसणारी गर्दी चांगलीच ओसरली आहे. दारव्हा-दिग्रस-नेरमध्ये एक खरेदी विक्री संघ वगळता राष्टÑवादीचे अस्तित्व नाही. कोट्यातून आमदारकीचा प्रयोग जिल्ह्यात केला गेला. मात्र त्याचा राष्टÑवादीला फारसा फायदा झाल्याचे चित्र नाही. पुढे राष्टÑवादी पुसद तालुक्यापुरती मर्यादित आहे. तेथील यशात पक्षाचे योगदान किती, हा वेगळा विषय आहे. तेथे घरातूनच आव्हान उभे झाले आहे. ते तेवढे स्ट्राँग नाही, मात्र पक्ष नेत्यांसाठी चिंता वाढविणारे नक्कीच आहे.
लाभार्थ्यांची गर्दी अधिक
आजच्या घडीला राष्टÑवादी काँग्रेसमध्ये असलेली गर्दी ही बहुतांश लाभार्थ्यांचीच असल्याचे मानले जाते. ेमूळ पक्षसंघटन व तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड अभाव आहे. येथे राष्टÑवादीची भूमिका ही स्वतंत्र नव्हे तर सत्ताधारी भाजपाच्या सोईची असल्याने अनेक कार्यकर्त्यांना ती खटकतेसुद्धा. मात्र जेष्ठ नेतृत्वच नांग्या टाकत असल्याने कार्यकर्त्यांची गोची होते. जिल्हा बँकेत राष्टÑवादीची भूमिका ही भाजपाच्या सोईची आहे. तेथे बहुतांश काँग्रेस-राष्टÑवादीच्या विचाराचे संचालक असताना केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी अवघ्या तीन संचालकांच्या बळावर भाजपाला बँकेचे अध्यक्षपद अक्षरशा बहाल केले गेले. आता भाजपा आपल्या सोईने बँक चालवत आहे, मात्र राष्टÑवादीला ‘व्हॉईस’ राहिलेला नाही.
राष्टÑवादीची आंदोलने लुप्त
जिल्ह्यात काँग्रेस व राष्टÑवादी विरोधी पक्ष म्हणून असले तरी प्रत्यक्षात राष्टÑवादीची जनतेच्या प्रश्नावर कुठेही आक्रमकता दिसत नाही. त्या तुलनेत काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली आहे.
राष्टÑवादी चक्क दावणीला
जिल्ह्यात राष्टÑवादी काँग्रेस पक्ष भाजपाच्या दावणीला बांधला गेल्याची कार्यकर्त्यांची ओरड आहे. त्यामुळेच की काय सर्वत्र राष्टÑवादीचे जुने संघटन खिळखिळे झाले आहे. गेल्या तीन वर्षात पक्षबांधणीवर भर दिला गेला नाही. त्यामुळेच आज राष्टÑवादीला जणू आपले अस्तित्व शोधावे लागत आहे. मरगळ आलेल्या राष्टÑवादीला पुन्हा उभे राहण्यासाठी नवसंजीवनीची गरज आहे. ही नवसंजीवनी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दौºयातून मिळण्याची अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. खासदार पवार यांचा हा विदर्भ दौरा ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारवर दबाव वाढविण्यासाठी असल्याचे मानले जाते. पवार यांच्या यवतमाळ मुक्कामी दौºयामागे शेतकºयांचे प्रश्न हे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात खिळखिळी झालेल्या राष्टÑवादीची नवसंजीवनी देऊन पुन्हा एकदा मोट बांधणे हासुद्धा छुपा अजेंडा असल्याचे सांगितले जाते. पवारांचा हा दौरा पक्षाला खरच किती ‘टॉनिक’ देऊन जातो हे भविष्यात पहायला मिळू शकते.