सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

By admin | Published: January 1, 2017 02:27 AM2017-01-01T02:27:46+5:302017-01-01T02:27:46+5:30

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील मराठा सेवा संघातर्फे

Savitri-Jijau Dasharathotsav | सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

Next

वणी : क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील मराठा सेवा संघातर्फे ३ ते १२ जानेवारीदरम्याान सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.
३ जानेवारीला दुपारी २ वाजता धनोजे कुणबी समाज भवनात दशरात्रोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ४ ला दुपारी २ वाजताा महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीकरिता वक्तृत्व स्पर्धा, नाटिका व वेशभूषा स्पर्धा घेण्यात येईल. ५ ला सकाळी ११ वाजता तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धा शासकीय मैदानात घेण्यात येणार आहे. यात १७ वर्षाखालील मुलांना सहभागी होता येईल. ६ ला सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात सायंकाळी ६ वाजता प्रकट वाचन स्पर्धा होणार आहे. यात तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
७ ला दुपारी १ वाजता सिद्धीविनायक मंगल कार्यालयात बालसंगोपन व कौटुंबिक संस्कार शिबिर, सायंकाळी ६ वाजता जिजाऊ ब्रिगेड व वर्धमान इंटरनॅशनलतर्फे कुटुंब मेळावा घेण्यात येईल. ८ ला सकाळी ११ वाजता रक्तदान व अवयवदान शिबिर, ९ वाजता जनता विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता पोस्टर स्पर्धा, दुपारी १२ वाजता नुसाबाई चोपणे विद्यालयात लेखन स्पर्धा होईल. ९ ला सायंकाळी ७ वाजता मुलींकरिता एकल लावणी व लोकनृत्य स्पर्धा, १० ला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता समूह नृत्य, १२ ला सायंकाळी ४ वाजता जिजाऊ जयंती सोहळा होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: Savitri-Jijau Dasharathotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.