लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : संपूर्ण देशात शिवाजी महाराज याची जयंती थाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांना गावागावात अभिवादन केले जाते. अठरापगड जातींच्या सहकार्याने ही जयंती साजरी होते. मात्र आता त्यांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी शिवाजी महाराज मनगटात नाही, तर मस्तकात उतरवा, असे आवाहन गंगाधर बनबरे यांनी केले.येथे तीन दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड.प्रमोद चौधरी होती. मंचावर कुमोदिनी नाफडे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, संदीप बुटले, विठ्ठल देशमुख, राजेश बुटले, प्रमोद कुदळे, प्रल्हाद पाटील जगताप, शहानवाज बेग, शेषराव डोंगरे, माधवराव जाधव, अंजली खंदार, छोटू देशमुख उपस्थित होते. प्रथम पुलवामा हल्ल्यातीन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले.शिव जयंतीनिमित्त तीन दिवस विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शिवाजी महाराज काय आहे, ते समजून घ्यावे असे आवाहन बनबरे यांनी केले. शिव चरित्र चिंतन करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.
शिवाजी महाराज मनगटात नाही मस्तकात उतरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 9:53 PM
संपूर्ण देशात शिवाजी महाराज याची जयंती थाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांना गावागावात अभिवादन केले जाते. अठरापगड जातींच्या सहकार्याने ही जयंती साजरी होते. मात्र आता त्यांच्या विचारांची गरज आहे.
ठळक मुद्देगंगाधर बनबरे : आर्णीत व्याख्यान