शूटर नवाबची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:23 PM2018-11-13T22:23:28+5:302018-11-13T22:24:18+5:30
१३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करणाºया हैदराबाद येथील शूटर (हंटर) नवाब पिता-पुत्राचीही चौकशी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करणाºया हैदराबाद येथील शूटर (हंटर) नवाब पिता-पुत्राचीही चौकशी केली जाणार आहे.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी येथे ‘लोकमत’ला ही माहिती दिली. अवनी मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय पथक येथे मंगळवारी दाखल झाले. या पथकाने राळेगाव तालुक्यातील बेस कॅम्प असलेल्या जंगलाला भेट दिली. या पथकासोबत सुनील लिमयेसुद्धा आहेत. ते म्हणाले, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. ज्या कक्ष क्रमांक १४९ मध्ये वाघिणीला ठार मारण्यात आले तेथे पथकाने सहा तास चौकशी केली. घटनेच्या रात्री नेमके काय झाले, याची उलट तपासणी केली जात आहे. शिकारी नवाब व त्याच्या मुलाचेही बयान होईल.