क्रीडाप्रेमी ठाणेदार वर्दीवरच उतरले कबड्डीच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 02:46 PM2021-01-28T14:46:40+5:302021-01-28T14:47:02+5:30

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या झरी येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी चक्क खाकी वर्दीत कबड्डीच्या मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करत अवघ्या क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले.

Sports fan Police Officer landed on the kabaddi ground in uniform | क्रीडाप्रेमी ठाणेदार वर्दीवरच उतरले कबड्डीच्या मैदानात

क्रीडाप्रेमी ठाणेदार वर्दीवरच उतरले कबड्डीच्या मैदानात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : कबड्डीसारख्या रांगड्या खेळाचे आकर्षण सर्वांनाच असते. अलिकडे हा खेळ दुर्लक्षित होत असला तरी ग्रामीण भागात मात्र कबड्डीच्या स्पर्धा आजही भरवल्या जातात. यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या झरी येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी चक्क खाकी वर्दीत कबड्डीच्या मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करत अवघ्या क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले. यावेळी निमित्त होते झरी येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाचे.

झरी येथे आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या हस्ते करण्यात आले. कबड्डीचे सामने सुरू होताच, मुळातच क्रीडाप्रेमी असलेले सोनुने यांना कबड्डी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. ते लगेच खाकी वर्दीवरच कबड्डीच्या मैदानात उतरले. त्यांच्या दमदार एंट्रीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यांनी एंट्री केली खरी, मात्र प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना लगेच बाद केले. त्यांच्या या खिलाडूवृत्तीचे उपस्थित क्रीडाप्रेमींनी टाळ्या वाजवून कौतुक केले. पोलिसांबद्दल सामान्यांच्या मनात कायम दरारा असतो. पण एखादा अधिकारी आपल्या अधिकारीपदाचा अभिनिवेश बाजूला सारून सामान्यांच्या समूहात सामील होतो, यातूनच सामान्य माणूस आणि अधिकारी यांच्यात सुसंवादाचा सेतू बांधला जातो. गुरूवारी कबड्डी सामन्यात झालेल्या या अनोख्या प्रकाराने नेमका हाच संदेश समाजवर्तुळात पेरला गेला.

Web Title: Sports fan Police Officer landed on the kabaddi ground in uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी