शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

एसटी महामंडळाला गैरव्यवहाराची वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 10:04 PM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगारात गैरव्यवहाराला प्रचंड ऊत आला आहे. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. एवढेच नाही तर, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून रकमेची उचल होत असल्याचे प्रकार घडत आहे.

ठळक मुद्देगंभीर प्रकरणे : अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, चौकशीत झाले स्पष्ट

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगारात गैरव्यवहाराला प्रचंड ऊत आला आहे. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. एवढेच नाही तर, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून रकमेची उचल होत असल्याचे प्रकार घडत आहे. अधिकाऱ्यांचे यावर कुठलेही नियंत्रण नाही, हे अनेक बाबीवरून स्पष्ट झाले आहे.‘एसटी’च्या तोट्याला वाहकच जबाबदार असल्याची ओरड महामंडळाकडून नेहमी केली जाते. मात्र इतरही घटक याला कारणीभूत आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. आर्थिक व्यवहारात एसटी कारवाई करण्यात थोडीही कसर सोडत नसल्याचे सांगितले जाते. तरीही गैरप्रकाराची मालिका सुरूच आहे. टायर फिटरच्या कामासाठी बाहेरील कामगारांची आयात या आगारात करण्यात आली होती. या कामासाठी एसटीचे स्वतंत्र तीन कामगार असताना अवाजवी दरात बाहेरील लोकांकडून टायर फिटरचे काम करून घेतले जात होते. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोहोचून कारवाई सुरू झाली.या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच १२०० रुपयांच्या अग्रिमचे प्रकरण पुढे आले. डी.आर. बनारसे नामक कामगाराने वाहनाच्या (क्र.८४४१) बेलहाउसिंग कामासाठी यवतमाळ आगाराच्या रोकड शाखेतून १२०० रुपयांची उचल केली. आठ दिवसांचा कालावधी लोटूनही खर्चाचा हिशेब या कामगाराने सादर केला नाही. रोकड शाखेतून उचल केलेल्या अग्रिम रकमेची प्रतिपूर्ती ४८ तासांच्या आत करण्याचा एसटीचा नियम आहे. एवढेच नाही तर, सहायक कार्यशाळा अधीक्षकांनी आगार व्यवस्थापकांच्या शिक्क्यावर स्वत:ची स्वाक्षरी करून अग्रिम रक्कम दिली. अधीक्षकाचा प्रभार सध्या जे.बी. खान यांच्याकडे आहे. आर्थिक बाबतीत कामगारांकडून झालेली चूक सहन न करणाऱ्या महामंडळाकडून या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे संपूर्ण कामगारांचे लक्ष लागले आहे.शिवशाहीला प्रवाशांची प्रतीक्षामहागामोलाची शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटूनही या बसला प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागते. यवतमाळ बसस्थानकातून सकाळी ६ वाजतापासून शिवशाहीच्या फेऱ्या सुरू होतात. काही बसेस तर नेमके प्रवासी घेऊन मार्गावर जाते. अधिक भाडे, प्रवासासाठी इतर बसेस ऐवढाच लागणारा वेळ आणि शिवशाही सोबतच लागणाऱ्या कमी प्रवासभाड्याच्या बसेस यामुळे शिवशाहीला प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते.