एसटी महामंडळाची ‘ओव्हर टाईम’वर उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:36 PM2018-01-10T22:36:46+5:302018-01-10T22:37:00+5:30

खर्चात बचत करण्यासाठी एसटी महामंडळाचा आटापिटा सुरू असताना यवतमाळ विभागात मात्र उधळपट्टी सुरू आहे. प्रामुख्याने अतिकालीक भत्ता (ओटी) सढळ हस्ते दिला जात आहे.

ST corporation's overtime scam | एसटी महामंडळाची ‘ओव्हर टाईम’वर उधळपट्टी

एसटी महामंडळाची ‘ओव्हर टाईम’वर उधळपट्टी

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक फटका : मागणी करूनही कमी वेतनश्रेणीचे कामगार वंचित, करारातही डावलले जाते

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खर्चात बचत करण्यासाठी एसटी महामंडळाचा आटापिटा सुरू असताना यवतमाळ विभागात मात्र उधळपट्टी सुरू आहे. प्रामुख्याने अतिकालीक भत्ता (ओटी) सढळ हस्ते दिला जात आहे. काही कामगारांचा ओटी तर त्यांच्या मूळ वेतनाच्या दुप्पट निघत आहे. कमी वेतनश्रेणीच्या कामगारांना बाजूला ठेऊन सुरू असलेला हा प्रकार विभाग नियंत्रकही नियंत्रणात का आणू शकत नाही, असा प्रश्न खुद्द कामगारांमधून विचारला जात आहे.
कमी वेतन श्रेणीच्याच कामगारांना अतिकालीक कामगिरी देण्यात यावी, असे महामंडळाचे आदेश आहे. जेणेकरून खर्चात कपात होईल. यवतमाळ विभागात प्रामुख्याने यवतमाळ आगारात मात्र हा आदेश गुंडाळून ठेवण्यात आला आहे. वेतनाचा दर अधिक असलेल्या अनेक चालक-वाहकांना अतिकालीक भत्त्याची कामगिरी वारंवार दिली जात आहे. काही कामगारांना तर १२५ तासांचा अतिकालीक भत्ता मिळालेला आहे. मूळ वेतनाच्या तिप्पट रक्कम या कामगारांनी ओटीतून कमावली आहे. नोव्हेंबर महिन्यात ओटीच्या नावाखाली दिली गेलेली रक्कम महामंडळाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे. पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतची कमाई काही कामगारांनी नोव्हेंबर महिन्यात केलेली आहे. बहुतांश कामगारांच्या ओटीचे तास ५० पेक्षा अधिक आहे. १३ हजार, १४ हजार, १५ हजार, १६ हजार, १७ हजार, १८ हजार, २५ हजार एवढा ओटी मिळविणाºया चालक-वाहकांच्या वेतनाचा दर नऊ ते बारा हजारपर्यंत (मूळ वेतन) आहे. त्यांच्या अतिकालीक भत्त्याचा दरही २०० रुपयांपेक्षा अधिकच आहे.
कनिष्ठ वेतनश्रेणीच्या कामगारांच्या वेतनाचा दर केवळ १०० ते १२५ रुपये इतका आहे. या कामगारांना अतिकालीक भत्त्याची कामगिरी दिल्यास खर्चात मोठी बचत होऊ शकते. शिवाय या कामगारांकडून तशी मागणीही केली जाते. मात्र काही अधिकाºयांकडून वैयक्तिक हितापोटी कमी वेतनश्रेणीच्या कामगारांना डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. प्रासंगिक करार, शैक्षणिक सहल या कामगिरीपासूनही त्यांना वंचित ठेवले जाते. प्रासंगिक करारावर लावलेली कामगिरीही त्यांच्याकडून काढून घेतली जात असल्याचे प्रकारही यवतमाळ आगारात घडत आहेत. आगार व्यवस्थापकाचे यावर कुठलेही नियंत्रण नाही. विभाग नियंत्रकही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे एसटीच्या नुकसानीचा आकडा फुगतच चालला आहे. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.
विश्रांती रद्दचा नवा फंडा
कामगारांचा तुटवडा असल्याचा कांगावा करत विश्रांती रद्दचा नवा फंडा सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विशिष्ट लोकांचीच विश्रांती रद्द होत आहे. या कामगारांना ड्यूटीवर बोलावून आठ तासांच्या कामगिरीचे अतिरिक्त वेतन याशिवाय शिल्लक सुटीचा लाभ दिला जात आहे. एकीकडे चालक नसल्याने सेवानिवृत्तांना कामावर बोलाविण्याची तयारी महामंडळ करते आहे, तर यवतमाळ आगारात मात्र चालक-वाहकांना वर्कशॉप, कॅश, आरक्षण आदी ठिकाणी कामगिरी देण्यात येत आहे. काही लोकांना तर सलग महिनाभर अशी कामगिरी दिल्याचे प्रकार यवतमाळ आगारात घडले आहे.

Web Title: ST corporation's overtime scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.