‘लोकमत’चे अविनाश खंदारे यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:00 AM2019-08-28T00:00:00+5:302019-08-28T00:01:32+5:30
अविनाश खंदारे व त्यांच्या अर्धांगिनी उषाताई खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पैनगंगा नदीपात्रात झालेले शेतकरी आंदोलन, सावळेश्वर येथील माधवराव रावते या शेतकऱ्याची आत्महत्या अशा विविध घटनांच्या वृत्तांकनातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : ‘लोकमत’चे उमरखेड तालुका प्रतिनिधी डॉ. अविनाश खंदारे यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नांदेड येथे रविवारी झालेल्या सोहळ्यात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक धवन यांच्या हस्ते, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, खासदार हेमंत पाटील, माजी आयुक्त पुरुषोत्तम गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अविनाश खंदारे व त्यांच्या अर्धांगिनी उषाताई खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पैनगंगा नदीपात्रात झालेले शेतकरी आंदोलन, सावळेश्वर येथील माधवराव रावते या शेतकऱ्याची आत्महत्या अशा विविध घटनांच्या वृत्तांकनातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले.