शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नेर येथे रास्ता रोको
By admin | Published: March 28, 2017 01:24 AM2017-03-28T01:24:24+5:302017-03-28T01:24:24+5:30
शेतकऱ्यांना डावलून नाफेडने व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली. या प्रकाराची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी ...
नेर : शेतकऱ्यांना डावलून नाफेडने व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली. या प्रकाराची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी येथील बाजार समितीसमोर रास्ता रोको करण्यात आला. तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
शेतकऱ्यांची तूर खरेदी वाढावी यासाठी बारदाणा त्वरित उपलब्ध करावा, शेतमालाची बाजार समितीत अवैध अडत वसूल होत आहे, यातील दोषींवर कारवाई करावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देवून दिलासा द्यावा, सिलिंग, अत्यावश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, ६९ वर्षावरील शेतकऱ्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, कोरडवाहू शेतकऱ्यांना शेततळ्याऐवजी विहिरीसाठी अनुदान द्यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. युवा संघर्ष समितीचे गोपाल चव्हाण, संतोष अरसोड, सतीश चव्हाण, मिथून अलाटे, दिनेश चौधरी, गौरव नाईकर, संकेत ठाकरे, नीलेश शिंदे, भीमदास वरठी, दिनेश डहाके, सुभाष राखडे, मधुकर चव्हाण, सुरज भोयर, सीताराम वयले, रामेश्वर जाधव, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर राठोड, मुकुंद गावंडे, मनोहर देशमुख, पुरुषोत्तम राठोड, स्वप्नील गुल्हाने, अमोल जाधव, स्वप्नील शेटे, वसंत राठोड, राजू खाडे, प्रेमदास राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)