‘जेडीआयईटी’मध्ये शिक्षकांचा गौरव
By admin | Published: September 24, 2015 03:01 AM2015-09-24T03:01:09+5:302015-09-24T03:01:09+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन आणि अभियंता दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन आणि अभियंता दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षकांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव किशोर दर्डा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश काटपेल्लीवार, प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, रोटरी क्बलचे अध्यक्ष नारायण मेहरे, सचिव डॉ.संजय गुल्हाने, अॅड.किशोर देवाणी आदी मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना आदी बाबींवर विचार मांडले. प्रसंगी विवेक कवठेकर, मारुती इडपाते, देवराव डेबरे, नम्रता खडसे, प्रा.प्रगती पवार यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रा.सचिन आस्वार यांचा रासेयो क्षेत्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी सतीश फाटक, विनायक कशाळकर, विजय घाडगे, अभय देशपांडे, देवीदास गोपलानी, प्रा.गणेश काकड, डॉ.मेहरे, रत्ना बांगर, राम तत्त्ववादी, राजेश गडीकर, अभिजित दाभाडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.पद्मिनी कौशिक, प्रा.आशिष माहुरे, प्रा.सुजीत गुल्हाने, प्रा.पायल पावडे, प्रा.नितीन चव्हाण, प्रा.रणजित शेंडे, प्रा.जिरापुरे, प्रा.विद्याशेखर, प्रा.केतन हांडे, रासेयो विद्यार्थी हिमांशू बोपचे, तेजस कापसे, शुभम ढोरे आदींनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)