अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:47 AM2017-07-20T00:47:24+5:302017-07-20T00:47:24+5:30

गत अनेक वर्षांपासून अंगणवाडी तार्इंचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यात राज्यशासन सपशेल अपयशी ठरले आहे.

Thalnad of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

Next

पंकजा मुंडे विरोधात नारेबाजी : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत अनेक वर्षांपासून अंगणवाडी तार्इंचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यात राज्यशासन सपशेल अपयशी ठरले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात अंगणवाडी तार्इंनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन करून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री पंंंंंंंंंंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात बसस्थानक चौकातून अंगणवाडी तार्इंनी मोर्चा काढला. हा मोर्चा थेट जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे अंगणवाडीतार्इंनी मुख्य प्रवेश द्वारासमोर ठिय्या दिला. थाळीनाद करीत नारेबाजी केली.
‘अच्छे दिन कुणाचे, आमदार खासदारांचे’, ‘बुरे दिन अंगणवाडी तार्इंचे’, ‘एक रूपयाचा कडीपत्ता पंकजा मुंडे बेपत्ता’ अशा घोषणा देऊन सरकारच्या धोरणाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी अंगणवाडी तार्इंनी ‘मानधन नको वेतन हवे’ अशी घोषणा दिली. यावेळी मानधनात भरघोस वाढ करण्याची मागणी करण्यात आली. टिएचआर बंद करा, लाभार्थी आहाराचा दर वाढवून देण्यात यावा, सेवा समाप्ती लाभाची रक्कम देण्यात यावी, रिक्त जागेवर सेविका मदतनिसाची नेमणूक करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व कार्याध्यक्ष मंगला सराफ यांनी केले. विजया सांगळे, अरूणा अलोने, हुकूमताई ठमके, सुषमा पांडे, अनिता कुलकर्णी, माला क्षीरसागर यांच्यासह अनेक अंगणवाडीताई आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Thalnad of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.