ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दहीफळ-इंद्रठाणा फाट्यावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 03:09 PM2021-01-28T15:09:13+5:302021-01-28T15:09:26+5:30

चालकानेच पेटविला अपघातग्रस्त ट्रॅक्टर

Two-wheeler killed in tractor collision; Accident at Dahiphal-Indrathana fork | ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दहीफळ-इंद्रठाणा फाट्यावर अपघात

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; दहीफळ-इंद्रठाणा फाट्यावर अपघात

Next

यवतमाळ: तालुक्यातील दहीफळ-इंद्रठाणा फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने स्वत:च अपघातग्रस्त ट्रॅक्टर पेटवून दिले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.अमोल प्रभुदास राऊत (रा.हातगाव, ता.दारव्हा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो मोटरसायकलने नेरकडे येत असताना नवरंगे यांच्या शेताजवळ ट्रॅक्टर (एम.एच.२९/सी-५४६१) च्या चालकाने धडक दिली. अपघातानंतर ट्रॅक्टर पलटी झाला.

ट्रॅक्टरचालकाने स्वत:च ट्रॅक्टरला आग लावून दिली व पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोल हा फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. ताे आई-वडिलांना एकटाच मुलगा आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाविरूद्ध अधिकच रोष निर्माण झाला. आरोपी ट्रॅक्टरचालकाला अटक होणार नाही तोपर्यंत मृताचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा जमावाने घेतला. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनील खाडी यांच्यासह अनेकजणांनी ही भूमिका लाऊन धरली. नेर पोलिसांनी ट्रॅक्टरचालक सुनील चव्हाण याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Two-wheeler killed in tractor collision; Accident at Dahiphal-Indrathana fork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.