बीएस फोर वाहनांसाठी अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:00 AM2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:20+5:30

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वाहन वितरकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री केली जाते. नागरिकही हाच मुहुर्त निवडतात. त्यामुळे वाहन नोंदणीसाठी आरटीओकडे प्रचंड गर्दी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून ३१ मार्च पूर्वी प्रतिबंध असलेल्या बीएस फोर वाहना नोंदणी करण्याची प्रक्रिया केली जात आहे. संभाव्या गर्दी लक्षात घेता व नोंदणी प्रक्रियेला लागणार वेळ पाहून आरटींओणी नियोजन केले आहे.

Ultimatum for BS Four vehicles | बीएस फोर वाहनांसाठी अल्टिमेटम

बीएस फोर वाहनांसाठी अल्टिमेटम

Next
ठळक मुद्देआरटीओकडून २० मार्चची मुदत : दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रदुषण मानके यानूसार सध्या विक्रीला असलेल्या बी.एस - फोर वाहनांचे उत्पादन बंद केले आहे. बाजार उपलब्ध असलेल्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी आरटीओला ३१ मार्चचा अवधी दिला आहे.निर्धारित वेळे पूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरटीओंनी बीएस फोेर वाहन खरेदी करणाऱ्यांना २० मार्चचा अवधी दिला आहे. त्यानंतर आलेल्या वाहनांची नोंदणी करण्यात येणार नाही.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वाहन वितरकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांची विक्री केली जाते. नागरिकही हाच मुहुर्त निवडतात. त्यामुळे वाहन नोंदणीसाठी आरटीओकडे प्रचंड गर्दी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून ३१ मार्च पूर्वी प्रतिबंध असलेल्या बीएस फोर वाहना नोंदणी करण्याची प्रक्रिया केली जात आहे. संभाव्या गर्दी लक्षात घेता व नोंदणी प्रक्रियेला लागणार वेळ पाहून आरटींओणी नियोजन केले आहे.
२५ मार्चचा गुढी पाडवा असल्याने वाहन नोंदणीची प्रक्रिया ही २० मार्च पूर्वी करावी लागणार आहे. यामध्ये नोंदणी शुल्क व कराचा भरणा करावा, यानंतर नोंदणी होताच वाहनांना तत्काळ नंबर प्लेट बसवून वितरक वाहनधारकांच्या ताब्यात देऊ शकतात. गुढी पाडव्याच्या मुहुर्ताचा अट्टाहास असतो. तो साध्य व्हावा याकरात खबरदारी घेण्यात आली आहे.
बीएस सहा याच वाहनांची ३१ मार्चनंतर संगणकीय प्रणालीवर नोंद होणार आहे. आॅनलाईन प्रक्रिया असल्याने बॅक डेटचा आधार घेण्याची संधी वाहन वितरक व वाहन धारकांना मिळणार नाही. नोंदणी न झालेले वाहन वापरता येणार नाही. अशा स्थितीत बीएस चार वाहनांच्या नोंदणीसाठी तसदी घ्यावी लागणार आहे.

न्यायालयाचा आदेश व संगणकीय प्रणालीत होणार बदल पाहता बीएस फोर वाहन नोंदणीसाठी अल्टीमेटम दिला आहे. वाहन वितरक व वाहनधारक यांनाही याबाबत अवगत केले आहे. संपूर्ण प्रक्रिया वेळत करण्यासाठी परिवहन यंत्रणा सज्ज आहे.
- राजेंद्र वाढोकर
उपप्रदेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ

ग्राहकांना प्रतिक्षा
बीएस फोर वाहनांवर आलेली बंदी, आटोमोबाईल्स क्षेत्रातील मंदी पहाता आता ठराविक कालावधीत विक्रीचा अल्टीमेटम आल्याने डिस्काऊंट मिळणार याची प्रतिक्षा ग्राहकांना आहे. बीएस फोर वाहने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर डिस्काऊंटमध्ये मिळावी अशी अपेक्षा आहे.

Web Title: Ultimatum for BS Four vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.