वनपरिक्षेत्र अधिकाºयाने केली अवैध सागवान कटाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:53 PM2017-07-30T23:53:44+5:302017-07-30T23:54:03+5:30
वनाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका वनपरिक्षेत्र अधिकाºयानेच आपल्या शेतातील सागवानाची विनापरवाना तोड केल्याची धक्कादायकबाब हिवरी वनपरिक्षेत्रात पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वनाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका वनपरिक्षेत्र अधिकाºयानेच आपल्या शेतातील सागवानाची विनापरवाना तोड केल्याची धक्कादायकबाब हिवरी वनपरिक्षेत्रात पुढे आली आहे. एक-दोन नव्हे तब्बल ११० सागवान वृक्ष तोडल्याचे काजणी शिवारात दिसून आले. या प्रकरणाने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
हिवरी वनपरिक्षेत्रातंर्गत काजणी शिवारात मोबाईल स्कॉडचे आरएफओ पद्माकर विश्वनाथ नाल्हे व त्यांच्या पत्नी सविता नाल्हे यांच्या नावाने शेती आहे. या शेतातील सागवानाची नाल्हे दाम्पत्यांनी कोणतीच परवानगी न घेता थेट कटाई करून विक्री केल्याचा आरोप आहे. तसेच शेता लगतच्या जंगलातील सुध्दा सागवानाची कटाई करून तब्बल ११० झाडे एका ठेकेदाराला दिली. विशेष म्हणजे आरएफओ नाल्हे यांनी काजणी येथील एका शेतकºयाने पाच सागवान झाडे तोडतांना परवानगी घेतली नव्हती तर त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली होती. आता त्याच अधिकाºयाने पदाचा गैरवापर केला आहे, अशी तक्रार काजणी येथील प्रकाश राघोजी राऊत यांनी मुख्य वनसंरक्षकांकडे केली होती. याच तक्रारीवरून हिवरीचे आरएफओ शंकर हटकर यांनी नाल्हे यांच्या शेत प्रत्यक्ष जावून पाहणी केली. येथे त्यांना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केल्याचे आढळून आले. नाल्हे यांच्या शेतात किमान २० थुट येथे दिसल्याचे हटकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. शेताची सीमा निश्चित होत नसल्याने पुन्हा पाहणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. याशिवाय सहायक उपवनसंरक्षक गिरजा देसाई यांनी सुध्दा या शेताची पाहणी केली आहे.
वनविभागातील जबाबदार अधिकारी कायदे मोडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा अधिकाºयांकडून वनाचे खरचं संरक्षण होईल काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. वनविभागातील वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरएफओ नाल्हे यांनी शेतातील सागवानाची विना परवानगी तोड केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. याची चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त होताच सबंधीताचा दोष आढळल्यास कारवाईचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविण्यात येईल.
- भानुदास पिंगळे
उपवनसंरक्षक, यवतमाळ