गावोगावी श्रमदान, श्रमाला प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:20 PM2018-04-24T22:20:45+5:302018-04-24T22:20:45+5:30

दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्वसामान्य गावकऱ्यांना नवा हुरूप आला आहे.

Village wise Shramdan, Shramma Motivation | गावोगावी श्रमदान, श्रमाला प्रेरणा

गावोगावी श्रमदान, श्रमाला प्रेरणा

Next
ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनचे तुफान : महिला शिक्षणाधिकारी राबल्या शिरोली, ससानी, कुंभारीत

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्वसामान्य गावकऱ्यांना नवा हुरूप आला आहे.
पाणी फाऊंडेशन अंतर्गत ‘सत्यमेव-जयते’ वॉटर कप स्पर्धा सुरु आहे. यात घाटंजी तालुक्यातून ४८ गावांनी सहभाग घेतला आहे. या सर्व गावांमध्ये श्रमदानाचे एकप्रकारे तुफान आले आहे. प्रत्येक गावातील आबालवृद्ध, सर्व नागरिक, विविध संघटना सहभाग नोंदवून स्वयंस्फूर्तपणे श्रमदान करीत आहे. त्यातच जिल्ह्याच्या ठिकाणावरुन येऊन शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी गावकºयांना नवा उत्साह दिला. त्यांच्या सोबत शिक्षक आणि विद्यार्थीही श्रमदानात सहभागी झाले आहे. शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी ससानीे, कुंभारी येथे हातात टिकास-पावडे घेऊन श्रमदान केले. शिरोली येथे तर भरदुपारी त्यांनी श्रमदान केले. उन्हाची तमा न बाळगता महिला अधिकारी गावापासून ते श्रमदानाच्या ठिकाणापर्यंत एक ते दीड किलोमीटर पायी चालत गेल्या. हे पाहून गावकऱ्यांचा उत्साह वाढला.
येणाऱ्या पिढीसाठी जलसाठे भरपूर असावे. आपल्या चिमुकल्यांची पाण्यासाठीची पायपीट थांबावी म्हणून राबणाऱ्या हाताना आपल्या मदतीची जोड मिळावी असे मत शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी व्यक्त केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आॅनलाईन लिंक तयार करून शिक्षकांना या श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी घाटंजी तालुक्यात विविध गावांमध्ये शिक्षणाधिकारी पोहचल्या असता शिक्षकांनीही त्या-त्या ठिकाणी धाव घेवून श्रमदान केले. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी मागील वर्षीही राळेगाव तालुक्यात श्रमदान केले होते.
दारव्हा शहरवासीयांनी काढली ‘वॉटर कप रॅली’
दारव्हा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दारव्हा शहरात मंगळवारी वॉटर कप रॅली काढण्यात आली. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव-जयते’ वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५५ गावे सहभागी झाली आहे. गावकरी श्रमदानाद्वारे गावाच्या विकासासाठी झटत आहे. विविध प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु गावकºयांचा उत्साह कायम राहावा तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, शहरातील नागरिकांचा सुद्धा या कार्यात सहभाग वाढावा यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्या दृष्टीने तहसीलदार कार्यालयातून रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा तहसील परिसरात समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. पाण्याचे महत्व लक्षात घेता या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी दारव्हा शहरवासीयांना केले. पानठेल्याभोवती गर्दी करणाºया युवकांना उद्देशून ते म्हणाले भविष्यात पानठेल्या ऐवजी पाणी ठेले निर्माण झाले पाहिजे असे कार्य करा. सूत्रसंचालन गणेश भोयर यांनी केले. या रॅलीत मॉर्निंग वॉक ग्रुप, चैतन्य ग्रुप, व्यापारी संघटना, वकील संघटना, डॉक्टर संघटना, मेडीकल असोसिएशन, पत्रकार संघ, ज्येष्ठ नागरिक, महिला मंच यासह अधिकारी, कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Village wise Shramdan, Shramma Motivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.