यवतमाळमध्ये कोणाचं पारडं जड? महायुती कि महाविकास आघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:02 PM2024-11-23T12:02:48+5:302024-11-23T12:03:33+5:30
Yavatmal Vidhan Sabha Assembly Election Result 2024 winning candidates LIVE Updates : राज्याचा निकाल यवतमाळमध्ये समांतर असेल का?
यवतमाळ : महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल केंद्राचे राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार असं समजल्या जाते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या लढाईत महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे. विदर्भाचा निकाल राज्याचं राजकारण ठरवणार असं समजल्या जात होत आणि आकडेवारीनुसार सुद्धा तसंच समोर येत आहे. विदर्भात ६२ पैकी ५२ मतदारसंघात महायुतीने आघाडी घेली आहे आणि महाविकास आघाडीला दहापेक्षाही कमी जागांवर समाधान मानावे लागणार असा आतापर्यंतच्या निकालातून दिसत आहे.
विदर्भातून यवतमाळ जिल्ह्याच्या सात मतदारसंघातून पाच जागांवर महायुतीने बाजी मारल्याचं दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार यवतमाळ मतदारसंघातून चौथ्या फेरीअखेर बाळासाहेब मांगुळकर (महाविकास आघाडी) यांना १७१७० मते मिळाली तर मदन येरावार (महायुती) यांना १११८९ मिळाली. महाविकास आघाडीचे बाळासाहेब मांगुळकर ५१८१ मतांनी आघाडीवर आहेत. उमरखेड मतदारसंघात किसनराव वानखेडे (महायुती) १९९०६ मतांसह महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे (१३१४९) यांच्यापेक्षा ६७५७ मतांनीं आघाडीवर आहेत. पुसद मतदार संघातून आठव्या फेरीअखेर अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक ३५९७६ मतांनी आघाडीवर, आर्णी मतदारसंघातून सातव्या फेरीअखेर महायुतीचे राजू तोडसाम २७६३ मतांनी आघाडीवर, दिग्रस मतदार संघातून दहाव्या फेरीअखेर महायुतीचे संजय राठोड ३७९२ मतांनी आघाडीवर, वणी मतदार संघातून सातव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे संजय देरकर ५९२४ मतांनी आघाडीवर, तर राळेगाव मतदार संघातून तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे अशोक उईके फक्त ३१ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.