ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यात शेतकरी स्वावलंबन केंद्र उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. यात खास शेतकºयांच्या उत्पादित मालासाठी मॉल उभरला जाणार असून यात दलाल, व्यापाºयांना कोणताही थारा असणार नाही.शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांना मिळत नाही. शेतमालास वाजवी दरही मिळत नाही. यातून कृषी अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. तरूण पिढीने शेतातून काढता पाय घेतला. हे चित्र बदलण्यासाठी जिल्ह्यात शेतकरी स्वावलंबन केंद्र उभारले जात आहे. जिल्ह्याने प्रगतीकडे वाटचाल करावी म्हणून जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.बसस्थानक चौकातील जिल्हा परिषदेच्या जागेवर नावीन्यपूर्ण योजनेतून हे शेतकरी स्वावलंबन केंद्र उभारले जात आहे. या केंद्राच्या निर्मितीसाठी चार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील दोन कोटींचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन कोटींच्या कामाला नव्याने मंजुरी देण्यात आली. शेतकरी स्वावलंबन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे.या केंद्रात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण हॉल उभारण्यात आला आहे. शेती विषयक मॉलही तेथे असणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.विशेष म्हणजे कुठलाही व्यापारी या मॉलमध्ये शिरणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्याच्या नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची समिती लक्ष ठेवून राहणार आहे. या स्वावलंबन केंद्रात जिल्हा परिषद, राज्य कृषी विभाग, रेशिम, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, दुग्ध केंद्र, बळीराजा चेतना अभियान, बँका, माती परीक्षण प्रयोगशाळा, नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे तंत्रज्ञान विभाग आणि विविध शेतकरी हिताच्या योजना राबविणाºया कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र कक्ष राहणार आहे.बाजारपेठेची माहिती उपलब्धया स्वावलंबन केंद्रात शेतकरी हिताच्या योजना, अनुदान आणि जोडधंद्याची माहिती एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे स्वावलंबन केंद्रात येणाºया शेतकºयांना सर्व विषयांची इत्त्थंभूत माहिती मिळेल. यातून शेतकºयांपर्यंत प्रत्यक्षात माहिती, अनुदान पोहोचण्यास मदत होईल. दलालांना आळा बसणार आहे. शेतकरी आणि शेतकरी पुत्रांना शेती विषयातील नवीन तंत्रज्ञान मिळण्यास मोलाची मदत मिळणार आहे. नवीन पीक पद्धती आणि त्याचे फायदे, बाजारपेठ, त्याची स्थिती, अशी संपूर्ण माहिती याठिकाणी उपलब्ध राहणार आहे. यामुळे हे स्वावलंबन केंद्र शेतकºयांना तारक ठरण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांसाठी यवतमाळात मॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 10:13 PM
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यात शेतकरी स्वावलंबन केंद्र उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. यात खास शेतकºयांच्या उत्पादित मालासाठी मॉल उभरला जाणार असून यात दलाल, व्यापाºयांना कोणताही थारा असणार नाही.
ठळक मुद्देस्वावलंबन केंद्र : सर्व माहिती एकाच छताखाली मिळणार