दाटला हुंदका... आमदारकी सोडली; निलेश लंकेनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 08:42 PM2024-03-29T20:42:16+5:302024-03-29T20:43:54+5:30

राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना व्यासपीठावर रडू कोसळले

Datla Hundaka...left MLA; Nilesh Lanke blew the trumpet of the Lok Sabha | दाटला हुंदका... आमदारकी सोडली; निलेश लंकेनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

दाटला हुंदका... आमदारकी सोडली; निलेश लंकेनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

अहमदनगर : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी अखेर शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.  विधानसभा अध्यक्षांना आपण आजच राजीनामा पाठवत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना व्यासपीठावर रडू कोसळले. जनतेने आपणाला निवडून दिले. पण, विखे यांच्या विरोधातील लढाई लढण्यासाठी मुदतपू्र्व राजीनामा देण्याची वेळ आली. कायदेशीर अडचणी नको म्हणून आपण राजीनामा देत आहोत. कारण विरोधक कायदेशीर भांडवल करणार याची कल्पना आहे. शरद पवारांना मी लोकसभा लढविण्याचा शब्द दिला होता. मधल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देऊ शकलो नाही याचे दु:ख होते. ती भरपाई काढण्यासाठी आपण हा राजीनामा देत आहोत. विधानसभा अध्यक्षांकडे मुंबईत आजच हा राजीनामा सादर होईल. तसेच मेलवरही पाठवत आहोत, असे त्यांनी सांगितले. लंके यांनी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

Web Title: Datla Hundaka...left MLA; Nilesh Lanke blew the trumpet of the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.