अकोला-अकोट मार्गावर पेट्रोलचा टँकर उलटला; शेकडो लिटर पेट्रोल रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:09 PM2018-02-27T14:09:28+5:302018-02-27T14:09:28+5:30

चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

Petrol tanker turn over Akola-Akot route; Hundreds of liters of petrol on the streets | अकोला-अकोट मार्गावर पेट्रोलचा टँकर उलटला; शेकडो लिटर पेट्रोल रस्त्यावर

अकोला-अकोट मार्गावर पेट्रोलचा टँकर उलटला; शेकडो लिटर पेट्रोल रस्त्यावर

Next
ठळक मुद्देगायगाव येथील हिंदूस्थान पेट्रोलियम डेपो येथून अकोटच्या दिशेने जात असलेल्या एम.एच. २० ए.ए. ९९६१ क्रमांकाच्या टँकरचा पळसोद फाट्याजवळ स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसली, तरी शेकडो लिटर पेट्रोल वाहून गेले. काही नागरिकांनी टँकरमधील पेट्रोल चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जमावास पांगविले.


चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसली, तरी शेकडो लिटर पेट्रोल वाहून गेले. दरम्यान, टँकरमधील पेट्रोल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.
गायगाव येथील हिंदूस्थान पेट्रोलियम डेपो येथून अकोटच्या दिशेने जात असलेल्या एम.एच. २० ए.ए. ९९६१ क्रमांकाच्या टँकरचा पळसोद फाट्याजवळ स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी देवरी फाटा येथून पाणी भरून येत असलेल्या एम. एच. ३० व्ही. ६२७० क्रमांकाचा टँकर येत होता. अनियंत्रीत झालेल्या पेट्रोल टँकरने पाण्याच्या टँकरला धडक दिली. त्यामुळे पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. उलटलेल्या टँकरमधून शेकडो लिटर पेट्रोल रस्त्यावर वाहून गेले. ही वार्ता पसरताच नागरिकांनी पळसोद फाट्यावर मोठी गर्दी केली. यावेळी काही नागरिकांनी टँकरमधील पेट्रोल चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जमावास पांगविले. यावेळी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. पेट्रोलच्या टँकरचा स्फोट होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Web Title: Petrol tanker turn over Akola-Akot route; Hundreds of liters of petrol on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.