तेल्हारा : आधी रस्ता दया, मगच शाळा बंद करा; मालपुरावासीयांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:08 AM2017-12-19T00:08:41+5:302017-12-19T00:15:07+5:30
तेल्हारा : तालुक्यातील मालपुरा गावातील शाळा बंद करण्याबाबतचे पत्र शासनाने दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर गावाला प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, तेथील अंतर आपल्या गावापासून कमी असले, तरी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे, असा प्रश्न तालुक्यातील मालपुरा येथील नागरिकांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील मालपुरा गावातील शाळा बंद करण्याबाबतचे पत्र शासनाने दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर गावाला प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, तेथील अंतर आपल्या गावापासून कमी असले, तरी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे, असा प्रश्न तालुक्यातील मालपुरा येथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे आधी रस्ता दया, मगच शाळा बंद करा, अशी मागणी मालपुरावासीयांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे १८ डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
मालपुरा हे गाव १00 टक्के दलित वस्तीचे असून, तेथे इयता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू होती. सदर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने दोन शिक्षक येथे कार्यरत होते. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने सदर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला व सदर गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतर असणार्या तळेगाव बजार या गावातील शाळेत सदर शाळेतील विद्याथ्यार्ंना प्रवेश घेण्याबाबत सूचना देण्यात आली. मालपुरा या गावातून तळेगाव बाजार येथे जाण्यासाठीचा रस्ता हा शेतरस्ता असल्याने पावसाळाच्या दिवसात या रस्त्याने ये-जा करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळय़ाच्या दिवसात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आधी रस्ता बांधा, मगच गावातील शाळा बंद करा, अशी भूमिका घेतली असून, तीव्र आंदोलनाचा इशाराही जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनावर राम विकास चर्हाटे, संतोष चर्हाटे, विशाल गवारगुरू, नरेंद्र चर्हाटे, कैलास चर्हाटे, विकास दांडगे, अनिल पंचाग, सुभाष चर्हाटे, नागेश तेलगोटे, सूर्यकांता तेलगोटे, मायावती तेलगोटे, तृप्ती वानखडे, अनुराधा चर्हाटे, गौरव पचांग, नितीन पंचांग यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.