कापशी तलावाचा निधी ‘पीडब्ल्यूडी’कडे वळता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:59 AM2017-10-24T01:59:44+5:302017-10-24T02:00:00+5:30
अकोला : महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मनपाला प्राप्त निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला आहे. यापुढे ‘ पीडब्ल्यूडी’ विभागाकडून कापशी तलाव येथे पर्यटनस्थळासाठी विकास कामे केली जातील. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निर्देशानुसार हा निधी वळता करण्यात आल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कधीकाळी संपूर्ण जुने शहराला पाणीपुरवठा करणार्या कापशी तलावाच्या देखरेखीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. या तलावात होणार्या मासेमारीपासून मनपाला अत्यल्प आर्थिक उत् पन्न प्राप्त होते. तलावातील जलसाठय़ाचा पिण्यासाठी वापर होत नसून, प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. अशावेळी शहरातील पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मनपाने समोर केला असता, दीड वर्षां पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तातडीने पावणे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता.
या निधीतून तलावाला आवारभिंत उभारण्यासह विविध कामे प्रस्तावित आहेत.
महापालिकेने तलावाला आवारभिंत व रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर उर्वरित एक कोटी रुपयांतून सौंदर्यीकरणाची कामे ‘ पीडब्ल्यूडी’कडून पार पडतील. त्यानुषंगाने मनपाकडे जमा असणारे एक कोटी रुपये ‘पीडब्ल्यूडी’कडे वळती करण्यात आले आहेत.
कापशी तलाव येथे पर्यटन स्थळ विकसित करण्याला मन पाकडून विलंब झाल्यामुळेच हा निधी वळता करण्यात आला. मनपात भाजपाची सत्ता असताना प्रशासनाकडून काम करवून घेण्याची सत्ताधार्यांची जबाबदारी आहे.
-अँड. धनश्री अभ्यंकर, गटनेता भारिप-बमसं