अकोला जिल्ह्यातील जलसंकट तीव्र ; धरणात अल्प जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:01 PM2018-03-19T14:01:07+5:302018-03-19T14:01:07+5:30

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे.

Water scarity in Akola district; Shortage of water in the dam |  अकोला जिल्ह्यातील जलसंकट तीव्र ; धरणात अल्प जलसाठा

 अकोला जिल्ह्यातील जलसंकट तीव्र ; धरणात अल्प जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे.

अकोला: जिल्ह्यातील उमा धरण आटले असून, उर्वरित धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य ३७ ते ३९ अंशांवर पोहोचला आहे. एप्रिल-मे महिन्यात ही तीव्रता ४५ अंशांवर जाते. या उन्हातच दिवसेंदिवस धरणात उरलेले पाणीही आटत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट तीव्र झाले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी कोणती ठोस पावले उचलली, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जात आहे.
जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उमा धरण आटले असून, दगडपारवा धरणात पाणीच नाही. काटेपूर्णा धरणातील पाणीही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वाण धरण वगळता इतर धरणांत पाणी अत्यल्प उरले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे. आतापासूनच जिल्ह्यातील गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. एप्रिल, मे महिन्यात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली, तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे.

मशागतीची कामे थांबली!
रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केली जाते. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरटी केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. यावर्षीही पावसाच्या अनिश्चिततेचे भाकीत वर्तविण्यात येत असल्याने पावसाळ्यात तरी पाऊस पडेल का, याबाबत साशंक असणाऱ्या शेतकºयांनी नांगरटी, मशागतीची कामे थांबविली आहेत.


 काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठा
सात लाखांवर लोकसंख्या असलेल्या अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा धरणात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक असून, यात अर्धा गाळ असल्याने या धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. पाणी कमी असल्याने अगोदरच या धरणातून मूर्तिजापूर, साठ खेडी व अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी नाकारले आहे; पण या धरणातील अल्प पाण्यात पुढील सप्टेंबरपर्यंत अकोलेकरांची तहान भागेल का, असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.
 

धरणातील उपलब्ध जलसाठा
काटेपूर्णा - १०.९ टक्के
मोर्णा - १२.८१ टक्के
निर्गुणा - २०.५९ टक्के
उमा - ०.० टक्के
दगडपारवा - ०.० टक्के
वाण - ७७.९१ टक्के


 काटेपूर्णा धरणात १० टक्के एवढा जिवंत; परंतु अल्प जलसाठा आहे. त्यानंतर मृतसाठा उचलता येईल. यात गाळही आहे. त्यामुळे पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार असून, पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल.
जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.

 

Web Title: Water scarity in Akola district; Shortage of water in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.