२२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण

By जितेंद्र दखने | Published: May 15, 2024 10:42 PM2024-05-15T22:42:05+5:302024-05-15T22:42:21+5:30

राज्य शासनाकडून जिल्ह्यातील २५ या शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे.

25 schools will be hi-tech from 22.37 crores! Quality education will be provided in Zilla Parishad schools | २२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण

२२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण

अमरावती : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, इंग्रजी शाळांच्या तुलनेत शाळांचे विद्यार्थी कुठेही मागे राहू नये, यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, राज्य शासनाकडून जिल्ह्यातील २५ या शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २२ कोटी ३७ लाख ७३ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या शाळांसाठी राज्य शासनाने वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या सहा शाळांकरिता सुमारे कोटी ३ कोटी ६९ लाख ३० हजार आणि वर्ष २०२३-२४ मध्ये १९ शाळांकरिता सुमारे १८ कोटी ६८ लाख ४३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अशा सुमारे २२ कोटी ३७ लाख ७३ हजार रुपयांच्या निधीमधून जिल्हा परिषदेच्या २५ शाळांची ओळख आदर्श शाळा म्हणून या निधीतून विकसित केले जाणार आहे. या निधीमुळे जिल्हा परिषद शाळाही इंग्रजी शाळांच्या धर्तीवर हायटेक होणार आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम
जिल्ह्यातील १४ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवीन बांधकामे करण्यात येणार आहेत. या वर्गखोल्या अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहेत. यापैकी काही शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. सध्या केवळ गतवर्षी आलेल्या निधीमधून शाळेची कामे सुरू आहेत, तर उर्वरित शाळेसाठी गत मार्च महिन्यात निधी आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही कामे सुरू हाेणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

या शाळांचा बलणार चेहरा मोहरा
 चांदुर बाजार तालुक्याती  घाटलाडकी, शिरजगाव कसबा, बेलोरा, तळेगाव मोहना, विश्रोळी, राजना पूर्णा  कारंजा बहिरम, तोंडगाव ,शिरजगाव कसबा,ब्राम्हणवाडा थडी, शिरजगांव बंड, देऊरवाडा, धामनगांव रेल्वे मधील अंजनसिगी,मार्डी (तिवसा),बेनोडा (वरूड),हरम (अचलपूर),नांदुरा (अमरावती),पांढरी (अंजनगाव सुजी) टाकरखेडा (भातकुली), जळका जगताप (चांदुर रेल्वे), गांगरखेडा (चिखलदरा),येवदा(दर्यापूर), खिडकीकलम (धारणी), नेरपिंगळाई (मोर्शी), शिवणी रसुलापूर (नांदगाव खंडेश्वर)या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या सन २०२२-२३ आणि २३२४ या आर्थिक वर्षात २५ शाळांच्या नवीन बांधकामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून २५ शाळा आदर्श म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
- बुद्धभूषण सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: 25 schools will be hi-tech from 22.37 crores! Quality education will be provided in Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा