आज चंद्र 31 ऑक्टोबर, 2024 गुरूवार च्या दिवशी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपार नंतर मात्र, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखाद्याशी वाद संभवतो. स्वभावात तापटपणा वाढेल.