बुलडाणा : मोताळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी ३८ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:26 AM2017-12-19T00:26:51+5:302017-12-19T00:27:31+5:30
मोताळा: तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सरपंच पदाच्या दोन जागेसाठी १३ तर सदस्यासाठी २५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, गोतमारा ग्रामपंचायतच्या दोन जागा रिक्त राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सरपंच पदाच्या दोन जागेसाठी १३ तर सदस्यासाठी २५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, गोतमारा ग्रामपंचायतच्या दोन जागा रिक्त राहणार आहेत.
तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या दोन ग्रामपंचायतींसाठी येत्या २६ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया १४ डिसेंबर रोजी पार पडली असून, सरपंच पदासाठी डिडोळा बु. येथील सहा तर गोतमारा सात उमेदवार रिंगणात आहेत, तर सदस्य पदासाठी डिडोळा येथील १६ तर गोतमारा येथील ९ सदस्य निवडणूक रिंगणात कायम आहेत. डिडोळा बु. येथे सरपंच पदासाठी संतोष काशिनाथ भोपळे, भानुदास झाबाजी पठारे, शिराळ, गुलाब संतोष वाघ, रंजना दत्तात्रय चोपडे, सुरेखा कौतिक शिंबरे तर गोतमारा येथे सरपंच पदासाठी राजेंद्र शिवदास चव्हाण, राजू सूर्यभान तायडे, गजानन पुखराज चव्हाण, गोपाल लाखिचंद राठोड, अभयसिंग ताराचंद जघेनिया, सुरेश किसन चव्हाण, वर्षा भारत चव्हाण हे सात उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर गुलाबी थंडीतही दोन्ही गावातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, प्रचाराचा धुरळा जोरात उडत आहे.
निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार एम.के. डोईफोडे नायब तहसीलदार एस.एम. चव्हाण निवडणूक लिपिक कन्नर, भोंबे आदी कामकाज पाहत आहेत. यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
रणधुमाळी सुरू
मोताळा तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा करीत आहेत.
-