बुलडाणा: विहीर खोदताना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:20 AM2018-03-09T01:20:32+5:302018-03-09T01:20:32+5:30
पिंप्री गवळी(बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील जहागिरपूर-टेंभी शिवारात जुन्या विहिरीचे नूतनीकरण करीत असताना क्रेनच्या साबडीमधील सुमारे १५ ते २० किलो वजनाचा समाधान भास्कर पवार यांच्या डोक्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

मोताळा तालुक्यातील माकोडी येथील पुरुषोत्तम सोपान राणे यांच्या विहिरीचे काम चालू होते. तेथे पिंप्री गवळी येथील समाधान भास्कर पवार हा कामावर गेला होता. दुपारी विहिरीतील मलबा काढत असताना साबड्यामधील १५ ते २० किलो वजनाचा दगड थेट त्याच्या डोक्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन कुळकर्णी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सोबतच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर येथे पाठविण्यात आला आहे. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)