बुलडाणा : सुंदरखेड येथील सरस्वती विद्यालयात विज्ञान प्रदर्शनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:15 PM2017-12-12T13:15:03+5:302017-12-12T13:15:32+5:30
बुलडाणा : सुंदरखेड येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक उपकरणांच्या प्रदर्शनीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.
बुलडाणा : सुंदरखेड येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक उपकरणांच्या प्रदर्शनीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन शिक्षणाधिकारी डॉ.एस.एम.पानझाडे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना पानझाडे यांनी सांगितले की, ज्ञानी आणि अभ्यासू लोकांचा सहवास तसेच लाभ घ्या संस्थेचे अध्यक्ष प्रा.महाजन यांनी कल्पकता आणि शालिनता यांची कास धरण्याचे आवाहन केले. प्राचार्य आमोदकर यांनीही विद्यार्थ्यांना प्रयोगशिलतेचे महत्व समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे आणि साधने बघतांना मान्यवरांच्या प्रश्नांना मिळालेली उत्तरे विद्यार्थ्यांची अध्ययन तयारी स्पष्ट करणारी होती. विज्ञानाच्या शिक्षिका आगाशे आणि अन्य सहाय्यक शिक्षक सरस्वती विद्यालयाच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाची तयारी करतात आणि राज्यस्तरीय स्पर्धापर्यंत जातात यासंबंधी शिक्षणाधिकाºयांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.जवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाईक, शेळके, जाधव तसेच कुटे, पवार यांनी परिश्रम घेतले.