मोताळा तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:10 AM2017-12-20T01:10:18+5:302017-12-20T01:10:33+5:30

A case has been registered against a doctor in an illegal abortion case in Motala taluka | मोताळा तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

मोताळा तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देगुळभेली येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगावबढे: मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील अवैध गर्भपातप्रकरणी बोगस डॉक्टरविरुद्ध  धामणगावबढे पोलीस स्टेशनला १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.  
गुळभेली येथील एका महिलेचा सदरहू डॉक्टरकडे गर्भपात करण्यात आला होता. पीडित महिलेस त्या दरम्यान मोठी इजा झाल्यामुळे ती महिला उपचारासाठी जिल्हा  सामान्य रुग्णालयात दाखल झाली. सदरहू प्रकाराची जिल्हा शल्य चिकित्सक सरिता पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. 
याप्रकरणी डॉ. अमोल नाफडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ब्रिजलाल सुपडा चव्हाण रा. गुळभेली  कलम ४, ५ अवैध गर्भपात अधिनियम १९७१ सह कलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला व अटक केली. दिवाणी-फौजदारी न्यायालय मोताळा यांनी ब्रिजलाल चव्हाण यास २0 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: A case has been registered against a doctor in an illegal abortion case in Motala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.