महाराष्ट्र-गुजरातमधील दमणगंगा-पिंजर पाणीवाटप तंटा सुटला - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:44 PM2018-03-03T17:44:38+5:302018-03-03T17:44:38+5:30

बुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या  होणार आहेत.

Damanganga-Pinjar water dispute in Maharashtra-Gujarat gets resolved - Nitin Gadkari | महाराष्ट्र-गुजरातमधील दमणगंगा-पिंजर पाणीवाटप तंटा सुटला - नितीन गडकरी

महाराष्ट्र-गुजरातमधील दमणगंगा-पिंजर पाणीवाटप तंटा सुटला - नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दमणगंगा आणि पिंजर संदर्भात असलेला तंटाही संपुष्टात आला असून पुढील आठवड्यात यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी होणार आहे.. परिणामी नाशिक, नगर, आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरून या भागातील पाणी समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गुजरात आणि महाराष्ट्रात झालेला यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांना अमान्य होता.



- नीलेश जोशी
बुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या  होणार आहेत. परिणामी नाशिक, नगर, आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरून या भागातील पाणी समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. ३० हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून हे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भुपृष्ठ, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी बुलडाणा येथे दिली.
बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलांम बुलडाणा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ते बुलडाण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी राज्या राज्यात पाणीप्रश्नावर तंटे होते. पण आपण या खात्याचे मंत्री झाल्यानंतर हे तंटे मिटविण्याला प्राधान्य दिले असून नुकताच दक्षीणेतील दोन राज्यातील तंटा संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दमणगंगा आणि पिंजर संदर्भात असलेला तंटाही संपुष्टात आला असून पुढील आठवड्यात यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी होणार आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गुजराज आणि महाराष्ट्रात झालेला यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांना अमान्य होता.त्यामुळे या प्रश्नी दिल्लीमध्ये बैठक बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण केला होता. त्यात प्रारंभी यश आले नाही. परंतू नंतर सचिवांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात येऊन दमणगंगा आणि पिंजरमधील पाणी गोदावरी नदी सोडून नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. ३० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव या भागातील चार धरणांचा प्रश्नही मार्गी लागत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.

पाणीतंटे सोडविण्यावर भर
राज्या राज्यात पाणीप्रश्नावरून असलेले तंटे सोडविण्यावर या खात्याचे मंत्री झाल्यानंतर आपण भर दिला आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील दुष्काळी भागावरून असलेला तंटाही मार्गी लागत असून केनबेतवा प्रकल्पासाठी ४० हजार कोटी रुपयांची रुपरेषा ठरली आहे. त्यातही केंद्र सरकार ३० हजार कोटी रुपये टाकत असल्याचे गडकरी म्हणाले.

तर दक्षीणेतील पाणीसमस्या सुटेल
आंध्रप्रदेशातील पोलावरम धरणामुळे तेथे कृषी क्रांती झाली असून आंध्रात कृषीचे दहा हजार कोटींनी उत्पन्न वाढल्याचा दावा चंद्रबाबू नायडूंनी केला असल्याचे गडकरी म्हणाले. पोलावरम धरणातील १४० टीएमसी पाणी २१० किमी कॅनॉलद्वारे कृष्णा नदीत जोडण्यात आल्याने या भागात पाण्याची उपलब्धता होऊन हे उत्पन्न वाढले आहे. दरम्यान, तीन हजार टीएमसी पाणी गोदावरीमधून वाहून जात आहे. त्या पाण्याचे योग्य नियोजन करून धरणांमधील बॅक वॉटर पोलावरम, कृष्णा, पेरोममध्ये सोडल्यास आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक या चार राज्यांचा पाणीप्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल. या माध्यमातून ७५० ते ८५० एमलटी पाणी वाचविल्यास मोठी मदत होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: Damanganga-Pinjar water dispute in Maharashtra-Gujarat gets resolved - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.