जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

By संदीप वानखेडे | Published: May 9, 2024 09:08 PM2024-05-09T21:08:59+5:302024-05-09T21:09:09+5:30

डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा नातेवाईकांचा आराेप

Death of a newborn baby in District Women's Hospital | जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

बुलढाणा : जिल्हा स्त्री रुग्णालयात एका नवजात बाळाचा ४ तासातच मृत्यू झाल्याची घटना ९ मे राेजी घडली़ यावेळी डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आराेप यावेळी नातेवाईकांनी केला़ तसेच दाेषीवर कारवाई करण्याची मागणी केली़.

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील सलमा सदफ यांना प्रसुतीसाठी चिखली तालुक्यातील एका ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते़ तेथे प्राथमिक उपचारानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले़ जिल्हा स्त्री रुग्णालयात या महिलेला रात्री मुलगी झाली़ मुलीचा जन्म हाेताच तीला झटके येत हाेते़ यावेळी मुलीचे वडील सैयद शफात यांच्यासह नातेवाईकांनी वार्डात नियुक्त स्टाफला आवाज दिला़ तसेच याविषयी माहिती दिली़ मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयात बालराेग तज्ज्ञ उपस्थित नसल्याचे सांगत आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप नातेवाईकांनी केला़ नवजात बाळाचा त्रास पाहता तिच्या वडीलांनी पहाटे ५ वाजता जिल्हा स्त्री रुग्णलयातून रेफर लेटर घेवून मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले़ मात्र, उपचार सुरू हाेण्यापूर्वीच बाळाचा मूृत्यू झाला़

दाेन परिचारिकांना केले कार्यमुक्त
या प्रकरणानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात कार्यरत दाेन परिचारिकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे़ या प्रकरणाची चाैकशी करून दाेषीवर जिल्हा शल्यचिकित्सक कारवाई करतील, असे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ़ प्रशांत पाटील यांनी सांगितले़

Web Title: Death of a newborn baby in District Women's Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.