बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयातील विद्यार्थी आंदोलनाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:01 AM2017-12-21T01:01:07+5:302017-12-21T01:07:06+5:30
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने गाजत असलेल्या जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. अंभोरे यांची अखेर चौकशी सुरू झाली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव एस.एस.खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बुधवार, २0 डिसेंबर रोजी प्रत्यक्षपणे तपासाला सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने गाजत असलेल्या जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. अंभोरे यांची अखेर चौकशी सुरू झाली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव एस.एस.खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बुधवार, २0 डिसेंबर रोजी प्रत्यक्षपणे तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात विद्यार्थ्यांनी प्राचार्य डी. एम. अंभोरे यांच्यावर अनेक आरोप केले. या सर्व आरोपांची शहानिशा आता ही समिती करीत आहे.
बुलडाण्यातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्या जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. अंभोरे यांच्या कारभाराच्या विरोधात; तसेच त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या अपमानजनक वागणुकीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन छेडलेले आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याची बाब श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यापयर्ंत पोचली. तसेच जिजामाता महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनीही एक संयुक्तरीत्या लेखी तक्रार संस्थाचालकांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव एस.एस.खाडे, कार्यकारिणी सदस्य ठुसे यांनी बुधवारी महाविद्यालयात येऊन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्य अंभोरे यांच्यावर काही आरोप केले आहेत.
यावर चौकशी समितीचे प्रमुख खाडे यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले की, प्राचार्य अंभोरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येतील. फक्त विद्यार्थ्यांनी आपले सर्व लेर्स नियमितपणे करावे व आपले शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, असे स्पष्ट केले.
या चौकशी समितीच्या सदस्यांनी संपूर्ण कॉलेज परिसराची बुधवारी पाहणी केली. प्रयोगशाळा, वाचनालयाचे निरीक्षण केले. याठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा नसल्याचे दिसून आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना समितीचे प्रमुख खाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी ज्या काही तक्रारी मांडल्या आहेत, त्यामध्ये तथ्यांश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर गंभीरपणे दखल घेऊन कारवाई करण्यात येईल.